💥मंदिर जिर्णोद्धारात अडथळा ठरणारा विद्युत पोल सखाराम बोबडे पडेगावकर यांनी हटवला...!


💥हरंगुळच्या शिवभक्तात समाधान💥

गंगाखेड (दि.३० एप्रिल) - राजा भर्तरीनाथ महाराज यांच्या कार्याने मराठवाडाभर प्रसिद्ध असलेल्या हरंगुळ येथे सुरु असलेल्या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा ठरणारा विद्युत पोल परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या पुढाकाराने शुक्रवारी हटवण्यात आला.हा पोल हटवल्याने शिवभक्तात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गावातील मुख्य रस्त्याच्या शेजारी शिव मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिराच्या गाभार्‍या शेजारीच गावाला वीज पुरवठा करणारा लोखंडी पोल आल्याने जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा येत होता. गावचे सरपंच बिबण पठाण यांनी ही बाब सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले यांना हरंगुळ मध्ये बोलावून घेऊन त्यांना प्रत्यक्ष पोल व जीर्णोद्धाराच्या कामाची परिस्थिती दाखवली .यानंतर सखाराम बोबडे यांनी लागलीच महावितरणचे अधिकारी श्री कैलास फड यांच्याशी संपर्क साधून हा पोल हटवावा अशी विनंती केली होती व निवेदनही दिले. शुक्रवार रोजी महावितरण कर्मचारी व मजूर यांनी भर उन्हात पोल हटवत बाजूला उभा करण्यात आला. मंदिराच्या हद्दीत विद्युत प्रवाह असलेला पोल हटविण्यात आल्याने जीर्णोद्धाराच्या कामास मोठ्या वेगाने सुरू झाली.  चार मे रोजी या मंदिराच्या कळसरोहन कार्यक्रम होणार आहे. पोल हटवला गेल्याने  शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले. सरपंच बिबन पठाण यांनी सर्वांचे आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या