💥नांदेड जिल्ह्यात आता लोकप्रतिनिधी सुध्दा सुरक्षित नाही : खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिवे मारण्याची धमकी...!

 


💥धमकी पत्रात १० करोड रुपयांची मागणी ? धमकीपत्र सहा महिन्यांपुर्वी आल्याचे खा.चिखलीकरांचे म्हणणे💥

नांदेड (दि.२० एप्रिल) -'मराठवाड्यातील नांदेड व परभणी ही दोन जिल्हे अत्यंत महत्वाची असून या दोनीही जिल्ह्यात हल्ली गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना पहावयास मिळत आहे यात नांदेड जिल्हा आता गुन्हेगारीत आघाडी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.औद्योगिक क्षेत्र,व्यापारक्षेत्र बांधकाम क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रात कार्यरत अनेकांना धमक्या तर काहींना जिवे मारल्याचे गंभीर प्रकार घडत असतांनाच आता राजकीय क्षेत्रात कार्यरत लोकांच्या मनात धडकी भरणारा गंभीर प्रकार समोर आला असून मागील वर्षी परभणी जिल्ह्याचे शिवसेना खासदार जाधव यांना जिवे मारण्याची धमकी आल्याची घटना घडली होती या घटने संदर्भात त्यांनी परभणीतील नानलपेठ पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल केला होता या नंतर आता पुन्हा नांदेड जिल्ह्याचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना एका पत्राद्वारे सहा महिन्यापुर्वी जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे व या पत्रात त्यांना १० करोड रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्वतः आपल्या भाषणात उघड केल्याने आता परभणी-नांदेड जिल्ह्यात लोकप्रतिनिधी सुध्दा सुरक्षित नसल्याचे उघड होत आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार चिखलीकर आलेले धमकीपत्र विशेष म्हणजे पत्र सहा महिन्यांपूर्वी आले असल्याचे जिल्हाकारी कार्यालया समोर भाषणात खुद्द खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.नांदेड शहरात व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्यात  मागील साडे तीन महिन्यात तब्बल तेवीस हत्या झाल्या आहेत. आज खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली.या आंदोलनाच्या समाप्ती नंतर खासदार चिखलीकर यांना धमकी आलेल्या पत्राची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.खा चिखलीकर यांना या धमकी पत्राबद्दल विचारले असता हे पत्र सहा महिन्यापूर्वी आले असल्याचे सांगितले या बदल पोलीस प्रशासनाला सांगितले असून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे खासदार चिखलीकर यांनी यावेळी सांगिलते यावेळी बोलतांना खा.चिखलीकर म्हणाले कीषनांदेड जिल्ह्यातील जनतेत भीतीचे वातावरण पसरु नये म्हणून मी या पत्राची वाच्यता कुठेही केली नाही.खासदाराला धमकीचे पत्र येत असेल तर जन सामान्यांचे काय .?असा प्रश्न खा.चिखलीकर यांनी केला आहे.सदरील पत्रात १० करोड रुपयांची मागणी केली असल्याचे यावेळी बोलतांना ते म्हणाले असल्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे ही यावेळी खा.चिखलीकर म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या