गौर गावातच नागरी समस्यांचा डोंगर अन् स्वप्न मात्र जिल्हा परिषद सदस्य पदाचे...!


💥सरपंच पती कारभारी अन् गावात घाणीचे साम्राज्य दारोदारी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ठरले फोल💥


पुर्णा ; तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील तब्बल साडेचार ते पाच हजार लोकसंख्येचे गाव असलेलेत्या गौर गावाच्या विकासासाठी भरघोस शासकीय विकासनिधी आल्यानंतर ही संपूर्ण गावात नागरी सुविधांचा अभाव जानवत असून "सरपंच पती कारभारी अन् गावात घाणीचे साम्राज्य दारोदारी" अशी अवस्था गावात झाल्याचे निदर्शनास येत असून स्वतःच्या गावात नागरी समस्यांचा डोंगर अन् स्वप्न मात्र जिल्हा परिषद निवडणूक लढवून निवडून येण्याचे अशी अवस्था सरपंच सौ.पारवे यांचे पती अनंता पारवे यांची झाल्याचे निदर्शनास येत असून "गौर गाव तसे फारच चांगले परंतु सरपंच पती महोदयांनी चक्क वेशीला टांगले" अशी अवस्था एकंदर झाली आहे. 


गौर गावाला संत गाडगेबाबा डिव्हीजन टिमचे अधिकारी व कर्मचारी आज मंगळवार दि.१९ एप्रिल २०२२ रोजी भेट देणार असल्याची चाहूल लागताच सरपंच पारवे व ग्रामसेवक लाडेकर यांनी संपूर्ण गावात अधिकारी पुर्वीच जेसीबी मशीनच्या साहाय्याने गावातील कचरा तसेच उकंडे साप करून संबंधित अधिकाऱ्यांच्या अक्षरशः धुळ झोकण्याचा प्रकार केल्याचे उघड झाले असून अश्या प्रकारे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकून गावाच्या विकासासाठी आलेला शासकीय विकासनिधी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून जिरवला जात असतांना वरिष्ठ अधिकारी मात्र आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचे निदर्शनास येत आहे.


💥गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर : पाणी पुरवठा योजनेसाठी आलेला लाखो रुपयांचा निधी जिरवला कागदोपत्री :


गौर गावातील नागरिकांना पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी यापुर्वी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला होता परंतु सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे कार्यान्वित न करता केवळ गावातील जलकुंभाला (टाकीला) रंगरंगोटी करून सदरील निधी कागदोपत्री हजम केल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या जश्यास तसीच असल्याचे निदर्शनास येत असून आता पुन्हा गौर ग्रामपंचायतला शासनाकडून जलजिवण मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला असून या योजनेचे काम गावात सुरू असून सदरील अत्यंत निकृष्ट दर्जाचे होतांना दिसत असून गावातील चांगल्या प्रकारचे रस्ते फोडून अवघ्या अर्धा ते एक फुटावर केवळ अडीच इंचाची पाईप लाईन टाकल्या जात असल्यामुळे सदरील कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहाणी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या