💥शिवसेनेच्या वतीने शंभूराजे महोत्सव ; भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन....!


💥स्पर्धकांना प्रथम पुरस्कार २१ हजार रुपये रोख, द्वितीय पुरस्कार ११ हजार रुपये रोख,तृतीय पुरस्कार ५१०० रुपये रोख💥 

 ✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद (दि.२८ एप्रिल) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची दिनांक १४ मे रोजी जयंती आहे या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद शहरात  दिनांक १ मे ते १४ मे पर्यंत "शंभूराजे महोत्सव" घेण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत शहरात भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.


दि. १ मे ते १४ मे पर्यंत ही स्पर्धा चालणार असून "ऐतिहासीक औरंगाबाद ते सुपर औरंगाबाद" या विषयाला अनुसरून ही स्पर्धा असणार आहे. स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी ४ ते ५ गटामध्ये सहभागी होऊ शकतात, आयोजकांच्या माध्यमातून भीत्ती चित्रासाठी भिंत व रंग दिले जाणार आहे भित्तीचित्र साठी स्प्रे मशीन किंवा इतर साहित्याचा वापर करू शकतो. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रुपने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे स्पर्धेत सहभागी विजेत्या स्पर्धकांना प्रथम पुरस्कार २१००० हजार रुपये रोख, द्वितीय पुरस्कार ११००० हजार रुपये रोख, तृतीय पुरस्कार ५१०० रुपये रोख देण्यात येणार आहे. चित्रकला, ललित कला विषयात आवड असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रुप ने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी ९८९००१८१८८, ७०२०५५९७४१, ९५०३३५८०४४ या मोबाईलवर किंवा आमदार अंबादास दानवे यांचे संपर्क कार्यालय क्रांतीचौक औरंगाबाद या ठिकाणी संपर्क साधावा.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या