💥जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात धावत्या बस चालकास भोवळ आल्यामुळे अपघात...!


💥जिवितहानी नाही प्रवाशी किरकोळ जखमी उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान💥

जिंतूर प्रतिनिधी/ बी.ड. रामपूरकर

शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कळमनुरी औरंगाबाद बस चालकाला धावत्या बस मध्ये भोवळ आल्याने बस थेट निळकंट हॉटेल समोरील नागरिक व वाहनावर जाऊन झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले. असल्याची घटना 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील बसस्थानकातून औरंगाबाद वरून कळमनुरी जाणारी  बस प्रवाशांना घेऊन  बस चालक दादाराव संभाजी धनवे वय 50 रा.वाई ता.कळमनुरी जि.हिंगोली बस कळमनूरी औरंगाबाद हि बस क्रमांक Mh 20 7543 हि दि.15 एप्रिल सकाळी दहाच्या सुमारास जिंतूर बस स्थानकातून 40 ते 45 प्रवासी घेऊन कळमनूरी कडे धावत निघाली असता शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात बस चालकाला अचानक भोवळ आल्याने बस वरील ताबा सुटला यावेळी बस निळकट हॉटेल समोर उभ्या असलेल्या नागरिक व वाहनावर  जाऊन थेट झाडावर जाऊन आदळली यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे उभ्या नागरिक बाजूला झाले मात्र यात  बस चालक दादाराव धनवे व प्रवाशी सुजाता श्रीकांत बोकसे वय 27, तुळशीराम चंपतराव तारे वय 50 वर्ष,श्रृती गजानन तारे वय 14 वर्ष हे जखमी झाले यावेळी जखमींना नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डाॅ.देवीदास गरड,परिचारिका वर्षा घुगे,देविका राखुडे,आघाव,शेख अखील आदीनी प्राथमिक उपचार केले आहेत घटनेची माहिती मिळताच  पोलीस प्रशासन व आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली असून घटनास्थळावर उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वृत्त लिही पर्यंत घटनेची नोंद झालेली नव्हती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या