💥स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज - डॉ. विजया साखरे


💥ऑनलाईन "स्त्री पुरुष समानता" या विषयावर आयोजित जाणीव जागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या💥


पूर्णा (जं.) :- स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असून स्त्रियांना समाजात समानतेची वागणूक मिळाली तरच सुदृढ समाज निर्माण होईल असे प्रतिपादन डॉ. विजया साखरे यांनी केले.त्या स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. आणि महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या वतीने आयोजित ऑनलाईन " स्त्री पुरुष समानता " या विषयावर आयोजित जाणीव जागृती कार्यक्रमात बोलत होत्या. आज समाजात स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जातो.शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही   पुरुषांना प्राधान्य दिले जाते असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार हे होते. अध्यक्षीय समारोप करतांना प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार म्हणाले की, स्त्री-पुरुष समानता निर्माण करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. प्रत्येक समाजातील पुरुष वर्गाने आपल्या जीवनात  स्त्रियांना  बरोबरीचे स्थान दिले पाहिजे तरच समाज सक्षम होईल.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कु-हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महिलांनी आपल्या कामाच्या ठिकाणी निर्भयपणे कार्य केले पाहिजे.गूगल मीटवर आयोजित या कार्यक्रमास आय. क्यू. ए. सी. समन्वयक  प्रोफेसर डॉ.भीमराव मानकरे  आणि महिला समितीच्या सदस्य  सौ. स्मिता अमृतराज कदम उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दीपमाला पाटोदे यांनी केले. सूत्रसंचालन  आयोजक प्रो.डॉ. शारदा बंडे यांनी केले तर आभार प्रा. वैशाली लोणे यांनी मानले.या ऑनलाईन कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या