💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे रेल्वेची धडक लागल्यामुळे 35 वर्षीय अनोळखी ईसमाचा मृत्यू....!


💥रेल्वे सेनेला ओळख पटविण्यात अखेर यश : मयत इसम नामे प्रकाश मुसा खरते हा मध्य प्रदेशातील राहणारा💥

औरंगाबाद (दि.17 एप्रिल) :- जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे आज रविवार दि.17 एप्रिल 2022 रोजी पहाटे  04-00 वाजे दरम्यान रेल्वेचा धक्का लागून एक अंदाजे वय 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता.रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी रेल्वे सेना मुख्यालय या व्हाट्सएपच्या (समाजमाध्यम ) गृप सह माझं लासुर सुंदर लासुर या ग्रुपला देखील घटनेची माहिती दिली होती.


यावरून लासुर स्टेशन येथील संजय पांडव (सरपंच पती )यांनी आता दुपारच्या वेळी कळविले की सदर व्यक्ती ही मध्यप्रदेश राज्यातील असून तो गावी जाणार होता असे त्याचा लासुर येथे मजूर काम करणाऱ्या त्याचा भाऊ विक्रम मुसा खरते वय 32 वर्षं धंदा मजुरी राह पांजरिया पोस्ट चाचरिया ता शेंदवा जिल्हा बारवणी मध्यप्रदेश यांनी संध्याकाळी 19:00 वाजे दरम्यान रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना प्रत्यक्ष भेटून घटनांचा फोटो पाहून ओळखले असून घटनेतील मयत हा त्याचा सख्खा भाऊ आहे मयताचे नाव प्रकाश मुसा खरते वय 35 वर्ष राह वरील प्रमाणे ह मु गीताबन लासुर स्टेशन ता गंगापूर असे आहे 

घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस हेडकोन्स्टेबल यशवंत चौधरी मपोशी धरती धवकर करत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या