💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट / बातम्या...!


💥पुण्यातील शाळेत वर्गात घुसून दहावीतील विद्यार्थिनीवर सपासप वार,एकतर्फी प्रेमातून हल्ला💥                       

 ✍️मोहन चौकेकर

1.श्रीगोंद्यात गणिताचा पेपर फुटला; बारावी बोर्डाच्या परीक्षांमधील पेपरफुटीचं सत्र थांबेना,बारावीचा पेपर फुटलाच नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे विधीमंडळात निवेदन 

2.बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला; मुंबईत कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक , 'पेपर फुटला' असं नाही, पुन्हा पेपर घेण्याचा प्रश्नच नाही; राज्य शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण  

3. पुण्यातील शाळेत वर्गात घुसून दहावीतील विद्यार्थिनीवर सपासप वार, एकतर्फी प्रेमातून हल्ला.. दहावीचा निरोप समारंभ सुरु असताना माथेफिरुचा हल्ला 

4. फडणवीसांनी उघडकीस आणलेलं स्टिंग ऑपरेशनप्रकरणाचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, तर अॅड प्रवीण चव्हाणांचा राजीनामा 

5. मुख्यमंत्री शिवसेनेचा पण महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे! सर्वाधिक निधीही राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांसाठीच,  अजितदादांना मानलंच पाहिजे, 57 टक्के पैसा राष्ट्रवादीकडे तर 16 टक्के शिवसेनेला; देवेंद्र फडणवीसांची टीका 

6.कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांमुळे सर्वोच्च न्यायालय चिंतेत, डॉक्टरांकडूनही मिळतंय खोटं सर्टिफिकेट 

7.कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, देशात गेल्या 24 तासांत 2503 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू ,   रविवारी राज्यात 251 नव्या रुग्णांची नोंद, पुण्यात सर्वाधिक रुग्ण

8. Coronavirus Vaccine : चांगली बातमी! 12 ते 14 वयोगटातील मुलांचे 16 मार्चपासून लसीकरण सुरू होणार 

9.पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर सोलापुरात काळाचा घाला, चौघांचा मृत्यू , शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू  

10. भारताची विजयी घोडदौड सुरुच, श्रीलंकेला पुन्हा व्हाईट वॉश, दुसरी कसोटीही 238 धावांनी घातली खिशात 

11.चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तीन शहरांत लॉकडाऊन तर तीन कोटी नागरिकांना घरात राहण्याचे आदेश....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या