💥भूमिपुत्र' शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन....!


💥अन्नदात्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आले आंदोलन💥

फुलचंद भगत

वाशिम:-भूमिपुत्र शेतकरी संघटनेचेच्या वतीने अन्नदात्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर १९ मार्च रोजी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

ह्या आहेत मागण्या :-

जमीन अधिग्रहण इत्यादी, खरीपातील पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन व तुरीला विम्याचा मोबदला देण्यात यावा, विद्यार्थि अपघात विम्याचा मोबदला २ ऐवजी ५ लाख २ करून जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असलेल्या या योजनेचा आढावा घेऊन नुकसान ग्रस्त कुटुंबाना व आपघातग्रस्त विद्यार्थाना मदत देण्यात यावी, 'कोरोना' मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास अर्थसाहाय्य देण्याच्या योजनेस गती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

अन्नदाता शेतकरी मागील काही वर्षापासून आसमानी व सुलतानी संकटात सापडला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अश्या स्थितीत अन्नदात्याला भिर देण्याची खरी गरज आहे. म्हणून अन्नदात्या शेतकऱ्यांच्या संकटात 'अचखाते' म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही धिर सोडू नका या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने एक दिवसाचा अन्नत्याग करून 'सहवेदना' व्यक्त कराव्यात. अन्नत्याग १९ मार्चलाच का? १९ मार्च १९८६ रोजी T delta जिल्हय़ातील चिलगव्हाण येथिल शेतकरी साहेबराव करपे यांनी व्यवस्थेला कंटाळून आपली दोन चिमुकली मुलं व पत्नीसह सहपरीवार आत्महत्या केली होती. ती पहिली जाहीर झालेली आत्महत्या होती. त्यांच्या स्मृती दिनी 'सहवेदना दिवस' पाळून त्या दिवसी अन्न त्याग करून. आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना सहवेदना दिली जाते. मागील अनेक वर्षांपासून किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब व भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. यावेळी वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भुमीपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विष्णुपंत भुतेकर जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उपाध्यक्ष उत्तम आरो डॉ. जितेंद्र गवळी, तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे, प्रवक्ता देव इंगोले यासह शेकड़ो भुमीपुत्रचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या