💥परभणी जिल्ह्यातील सात नगर पालिकांची प्रभाग रचना करण्यात आली जाहीर....!


💥प्रभाग रचने संदर्भात आक्षेप,हरकती,सूचना असल्यास मुदतीत सादर करण्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आवाहन💥

परभणी (दि.१० मार्च)  :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात माहे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये जिल्ह्यातील मुदत संपलेल्या पुर्णा,गंगाखेड,जिंतूर,सेलू,पाथरी, मानवत,सोनपेठ या सात नगर पालिकांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम - २०२२ आज दि.१० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे. 


या नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील तर त्यांनी कारणासह, संबंधित नगर पालिकांच्या मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात मंगळवार दि.१७ मार्च २०२२ रोजी पर्यंत लेखी स्वरूपात सादर कराव्यात मुदती नंतर आलेले आक्षेप,हरकती,सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत,याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

       या कार्यक्रमानुसार या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आालेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे  (महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या