💥पूर्णा येथील लिंगायत समाज बांधवानी केली स्मशानातील कचऱ्याची होळी....!



💥लिंगायत समाजाच्या या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक💥 


विविध उपक्रम राबवत समाजाला आपल्या कृती तुन संदेश देणारे पूर्णेतील लिंगायत समाज बांधवानी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्मशानातील कचऱ्याची होळी करत अनोखी होळी साजरी केली आहे,स्मशानात अंत्यसंस्कार वेळी बरेच लोक अनावश्यक कचरा आणून टाकल्याने स्मशानात स्वछता राहत नाही ,आणि हाआणलेला कचरा मृत व्यक्ती चे कपडे ह्यामुळे स्मशानात प्रचंड कचरा साठून राहतो, आणि त्यामुळे दुर्गंधी सुद्धा सुटते याच कारणामुळे गेले काही वर्षांपासून समाजातील युवकांनी दर होळी ला या निरुपयोगी साहित्य तसेच झाडांचा पाला पाचोळा यांची होळी करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे,

शहरातील लिंगायत समाज बांधवांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत्र आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या