💥दहशतवादी हल्ल्याच्या कटाचं बुलढाणा कनेक्शन,एनआयएचे बुलढाणा आणि गुजरातमधील गोधरात छापे....!


💥संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे💥

✍️मोहन चौकेकर

बुलढाणा : एनआयए रेड : हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुलढाणा आणि गुजरातमधील गोधरा येथे छापे मारल्याची माहिती आहे. रात्री उशिरा हे छापे मारण्यात आले आहेत. जानेवारी २०२० मध्ये आंध्र प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात हे छापे मारले असल्याचं एनआयए (National Investigation Agency) ने म्हटलं आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानी हेरांचा या कृत्यात सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. गुजरातमधील गोधरा व बुलढाणा येथे एकाच वेळी छापे मारण्यात आले असून यात काही संशयास्पद सिम कार्ड, संशयास्पद कागदपत्रे व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील जप्त केले असून, पुढील कारवाई होत आहे २०२० मध्ये आंध्र प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या