💥वास्तव सत्य...नेंत्यानो कोणत्याही गोष्टीच समर्थन करतांना वास्तवतेच जरा भान ठेवा...!


💥तुमचा स्वतःचा आणि तुमच्या निवडक कार्यकर्त्याचा फायदा झाला म्हणजे सर्वांचा फायदा हा गैरसमज अगोदर मनातून काढा💥 

[जनता आता खुप हुशार झाली आहे लोकांना गृहीत धरणे सोडा]

वास्तव सत्य ; प्रा.कुंडलीक जोगदंड


पुर्णेतील बळीराजा साखर कारखाना परिसरातील जनतेसाठी एक नवसंजीवनी घेऊन आला. सुरुवातीचे चार-पाच वर्षे हा कारखाना परिसरातील शेतकऱ्यांसोबत अतिशय चांगल्या पद्धतीने कच्च्या मालाच्या मोबदल्यांमध्ये व्यवहार करत होता. आणि आताही तो करतो आहे पण प्रश्न असा झाला की गेली तीन ते चार वर्ष झालं व्यवस्थित होणारे पावसाचे प्रमाण त्यामुळे तलाव नदी-नाले सतत तुडुंब भरून वाहिलेले जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आणि शेतकऱ्यांनी उसाकडे एक नगदी पीक म्हणून नजर टाकली.याच कारणामुळे परिसरात उसाचं क्षेत्र  वाढलं पण हे वाढलेले क्षेत्र बळीराजा साखर कारखाना काबीज करू शकतो. यात तिळमात्र शंका नाही पण कारखान्याच्या प्रशासनाने ऊस जास्त झाल्याच्या कारणावरून एक शक्कल लढवली परिसरातील ऊस तसाच ठेवून परजिल्हयातील उस आणण्याचा सपाटा लावला. 

त्यांच्या या निर्णय निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कारखाना सुरू झाल्यावर जो ट्रायल घेण्यासाठी ऊस दिला त्यावेळी ना कारखान्याच्या प्रशासनाची किंवा हमीभावाची कोणतीच माहिती नसताना  शेतकऱ्यांनी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास टाकला व कारखाना सुरू करण्यासाठी मदत केली. सुरुवातीच्या काळात कारखान्याचे कर्मचारी शेतकऱ्यांना तुम्ही आम्हाला उस द्या आम्ही विनाआट भविष्यात तुमचा ऊस घेऊन जाऊ असं आश्वासन दिलं याचमुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद असलेले शेतकरीसुद्धा दुष्काळाच्या काळात बळीराजा साखर कारखान्याला ऊस देऊन मोकळे झाले. पण याचा वाईट परिणाम आज त्या शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे या परिसरात कारखाना असल्यामुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या टोळ्या इकडे येण्यासाठी तिकडच्या प्रशासन जास्त धजावत नाही आणि बळीराजा साखर कारखाना 25 हजाराची लाच दिल्याशिवाय आमचा ऊस तोडत नाही ही प्रशासनाची आरेरावी पाहून या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, आम्हाला कोणीतरी नेता किंवा एखादी संघटना आम्हाला मदत करेल काय याची परिसरातील अडचणीत सापडलेले ऊस उत्पादक शेतकरी याची वाट पाहत होते.त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बळीराजा साखर कारखान्याच्या प्रशासनाला जॉब विचारण्याचा प्रयत्न केला. पण तोही प्रयत्न असफल ठरला म्हणून नाईलाजास्तव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 मार्च रोजी ताडकळस रोडवर रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला पण या प्रयत्नांना एक वेगळंच वळण मिळालं, कारखान्याचे कर्मचारी व परिसरातील स्वतःला नेता समजणारी काही नेते मंडळी कारखाना प्रशासनाला समर्थन देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची गळचेपी कशी केली जाईल, याच्यासाठी वेळातला वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिले पण त्यांना आणि काही जमीनदार शेतकऱ्यांना हे माहीत नाही की येणाऱ्या विविध निवडणुकांच्या काळामध्ये हाच ऊस उत्पादक शेतकरी आपल्याला मदत करणार आहे. पण हे सगळं विसरून जसं काय कारखाना यांचा स्वतःचा आहे आणि एकट्या कारखानदारांच्या जीवावर तुम्ही भविष्यातील निवडणूका जिंकू शकतील अशा अविर्भावात सर्वसामान्य अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना त्यानी डिवचलं आहे. आमचं म्हणणं असा आहे की कारखाना परिसरात चालला पाहिजे जसा नेतेमंडळी आणि जमीनदार शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जातो त्याच पद्धतीने सर्वसामान्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सुद्धा वेळेवर गेला पाहिजे आणि कारखाना सुद्धा व्यवस्थित चालला पाहिजे, यासाठी आम्ही अतिशय शांत व गांधीवादी तत्त्वानुसार तळपत्या उन्हामध्ये तपलेल्या डांबर रोडवर उन्हाचे चटके खात बसलो होतो. पण परिसरातील नेत्यांना जसं समर्थन द्यायला वेळ भेटला तसं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तुमची नेमकी समस्या काय आहे हा साधा प्रश्नसुद्धा विचारावासा वाटला नाही. दुःख याचं वाटतं हेच ऊस उत्पादक परिसरातला नेता म्हणून ज्यांच्याकडे भविष्यात आमदार म्हणून पाहतो त्याच बरोबर आमचेच पाहुणे परिसरातील जमीनदार शेतकरी यांचाही आम्हाला श्रीमंत असल्याचा अभिमान वाटतो त्याच नेते आणि पाहुण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी कारखान्याचा मत योग्य आहे असं कोणतीही शहानिशा न करता निर्विवादपणे जाहीर केल.आमचा ऊस कारखान्याने नेलाच नाही पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच नाही. पाहिजे यासाठी कसोशीने केलेले प्रयत्न आमच्या जिव्हारी लागले. कदाचित हे प्रयत्न भविष्यात अल्पभूधारक शेतकरी कधीही विसरणार नाही असे मला वाटते. हि लोक इतक्यावरच थांबले नाहीत तर प्रशासनाला हाती धरून आंदोलकांवर गुन्हे नोंद करायला सुद्धा कमी पडले नाहीत विचार केला तर आंदोलन करणारे रोडवरचे शेतकरी यांच्यापेक्षा कारखान्याच्या समर्थनासाठी दबावाखाली बोलावून घेतलेले शेतकरी कितीतरी पटीनं जास्त होते प्रशासनाला ही जास्त असलेले शेतकरी दिसलेच नाहीत. कारण त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता. फक्त पोटाच्या आगीसाठी तळपत्या उन्हात रोडवर बसलेले मोजके गरीब, अल्पभूधारक शेतकरी दिसले व ते जमाबंदी च्या नावाखाली गुन्हे नोंद करून मोकळे झाले. समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांनी नेमके समर्थन दिले कुणाला हेच कळत नाही कारण कारखाना 25000 भरून सभासद झालेल्या शेतकऱ्याचा ऊस फक्त दीडशे टनापर्यंत नेतो आणि जिल्ह्यातील एकाच श्रीमंत शेतकऱ्याच्या एकाच नावावर  500 टनेज च्या वर ऊस कारखान्यावर येतो आणि यांची दीडशे टणेजवर अडवणूक केलेली असताना सुद्धा हि लोक समर्थन द्यायला गेली म्हणजे यांच्या धडावर यांचंच डोकं नसल्याचा हा परिपाठ आहे. या समर्थन देणाऱ्या लोकांच्या धोतरा खालची चड्डी सुद्धा काढून घ्यायला कारखाना प्रशासन मागेपुढे पाहणार नाही. लक्षात असू द्या आज समर्थनात गेलात उद्या तुमच्यावर सुद्धा विरोध करण्याची वेळ येणार आहे मग तुम्हाला सावरायला सुद्धा वेळ भेटणार नाही म्हणजे तुमचं असं झालय...लोकांची कढी अन् धाऊ धाऊ वाढी....यांच्या पदरात तर  काहीच पडणार नाही पण एखाद्या मालकाने "छ्यु" म्हणावं आणि कुत्र्यांन धावत जाऊन निर्दोष माणसाला धरावं असच काहीसं काल झालेल्या अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन बळीराजा कारखान्याला समर्थन देणाऱ्या अती बुद्धिमान लोकांचं झालं. असं मला वाटतंय....

आपलाच 

प्रा पुंडलिक जोगदंड अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकरी तथा जिल्हा प्रवक्ता छावा मराठा संघटना परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या