💥मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेल्या तरुणाची उध्वस्त कुटुंबाला पुन्हासावरण्याची केविलवाणी धडपड....!

 


💥त्याला जगायच आहे आता केवळ कुटुंबासाठी परंतु परिस्थिती साथ देत नसल्यामुळे आता त्याला हवाय मानुसकीचा आधार💥

तरुण पिढी मानवी जिवनास अपायकारक असलेल्या विषारी गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःसह स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाचेही आयुष्य उध्वस्त करून घेत असतांना मात्र राज्यात गुटखा बंदी कायदा अंमलात आलेला असतांनाही या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी ज्या अन्न व औषधी प्रशासनावर आहे त्या अन्न व औषधी प्रशासनाचे भ्रष्ट अधिकारी व या विषारी गुटख्याचा व्यवसाय करून असंख्य तरुणांना अव्वाच्या सव्वा दरातील विषारी गुटख्याच्या रुपात कँन्सर सारख्या जिवघेण्या आजाराच्या विषाणूंचे मोफत दान करणाऱ्या मनुष्यरूपी रक्तसोशितांना लगाम लावण्यात राज्य शासनाला संपूर्णपणे अपयश आल्याने संपूर्ण राज्य आज विषारी गुटख्याच्या विळख्यात सापडून राज्यातील तरून पिढी कर्करोग अर्थात कँन्सरच्या विळख्यात अडकत आहे.

💥विषारी गुटखा पुड्यांच्या अतिसेवनामुळे सय्यद गौस सय्यद रसुल यांचे उभे आयुष्य झाले उध्वस्त :-


महाराष्ट्र राज्यात तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर सन २०१२ या वर्षापासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून बंदी घालण्यात आली राज्यात गुटखा बंदी कायदा लागू होण्यापूर्वी गोवा-सितार-विमल,पान पराग,तलब,माणिकचंद आदींसह विविध नावाने विक्री होणाऱ्या गुटखा पुड्यांची किंमत १ रुपये ते २ रुपये ५ रुपये पर्यंत होती परंतु राज्यात गुटखा बंदी कायदा लागू होताच संबंधित कंपन्यांकडून ज्या प्रमाणे गुटखा निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणेच या गुटखा पुड्यांची किंमत ही दुप्पट तिप्पट वाढल्यामुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत राजरोसपणे अगदी उघड उघड विक्री होणाऱ्या गुटखा पुड्या पुन्हा मिळल्या नाही तर करायचे काय ? या प्रश्नामुळे गुटखा सेवन करणाऱ्यांचे गुटखा पुड्या खरेदी करण्यासह गुटखा खाण्याचे प्रमाणही वाढले...राज्यात गुटखा बंदी कायदा लागू होण्यापूर्वी विक्री होणाऱ्या गुटखा पुड्या मानवी जिवणास जेवढ्या घातक नव्हत्या त्याही पेक्षा जास्त घातक व विषारी गुटखा पुड्यांची निर्मिती कंपन्यांनी सुरू केल्याने या गुटखा पुड्यांचे सेवन करणाऱ्यांमध्ये कँन्सर अर्थात कर्करोगाचे प्रमाणही वाढू लागले असून गुटखा पुड्यांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचे उभे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर असतांना मात्र राज्यातील अन्न व औषधी प्रशासनाची भुमिका मात्र संशयास्पद असल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्यातील प्रतिबंधीत विषारी गुटखा पुड्यांचे अतिसेवन करणे किती घातक ठरते याचे जिवंत उदाहरण समोर आले असून परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील मौ.कानखेड या खेड्यातील ३१ वर्षीय युवक सय्यद गौस सय्यद रसुल जो व्यवसायाने ड्रायव्हर आहे ३१ वर्षीय सय्यद गौस या तरुणाला वाहन चालवतांना अचानक गुटखा पुड्यांच्या सेवनाचे व्यसन जडले दिवसातून अंदाजे बारा ते पंधरा गोवा गुटख्याच्या पुड्यांसह दोन ते तिन सुरज तंबाखूच्या पुड्या खाण्याची सवय आपले उभे आयुष्य उध्वस्त करणार आहे यांचा यत्किंचितही अंदाजा सय्यद गौस यास आला नाही ११ मे २०११ यावर्षी सय्यद सायरा यांच्याशी निकाह (विवाह) झालेल्या सय्यद गौस सय्यद रसुल यांचा सुखी संसार चालत असतांना त्यांना तिन मुल आणि एक मुलगी ज्यात पहिला मुलगा सय्यद शाहबाज वय ८ वर्षे,दुसरा मुलगा सय्यद अलफेश वय ६ वर्षे,तिसरा मुलगा सय्यद फहाज वय ३ वर्षे व चौथी मुलगी सय्यद नर्गीस वय १५ महिने अशी चार अपत्य झाली चौथी मुलगी नर्गीस अवघ्या पाच सहा महिण्यांची असतांनाच सय्यद गौस यांना तोंडाचा कर्करोग (कँन्सर) झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले अन् त्यांच्या सुखी संसाराला अचानक दृष्ट लागल्या सारखे झाले.

सय्यद गौस सय्यद रसुल या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ड्रायव्हरकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्याला तरुणावर आलेले हे संकट तारण्यासाठी यावेळी ना समाज धावून आला नाही नातेवाईक नाही गावकरी मंडळी आता यापुढे करायचे तरी काय ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने हतबल झालेल्या सय्यद गौस यांच्या तोंडात आलेल्या एका छोट्याश्या गाठीचे रुपांतर पाहता पाहता मोठ्या जखमेत होऊ लागल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सय्यद गौस यांना नांदेड येथील खाजगी पॕथालॉजीत नेऊन गाठीचा नमूना तपासणीसाठी मुंबई येथे पाठवला असता सदरील गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले यानंतर नातेवाईक व हितसंबंधातील मंडळींनी वेळ वाया न घालता तात्काळ सय्यद गौस यांना औरंगाबाद येथील सेंच्युरी हॉस्पिटल या कँन्सर रुग्णालयात अॉपरेशनसाठी दाखल केले.

औरंगाबाद येथील सेंच्युरी हॉस्पिटल मधील आरोग्य तज्ञ डॉ.विजय घिरे व डॉ.शेख वहाब यांनी सय्यद गौस यांनी शासकीय स्किम मध्ये बसवून त्यांचे यशस्वीपणे अॉपरेशन करून त्यांच्या तोंडाचा काही भाग काढून टाकला व त्यांना नवीन जिवनदान दिले यावेळी बोलतांना कँन्सरग्रस्त सय्यद गौस म्हणतात माझे अॉपरेशन वेळेवर झाले नसते तर आज मी या जगात नसतो व माझे कुटुंब रस्त्यावर आले असते असे ही सय्यद गौस सांगतात तोंडाच्या कँन्सर नंतर माझे संपूर्ण जिवनच बदलले असून मला पातळ पदार्था व्यतिरिक्त काहीच सेवन करता येत नाही त्यामुळे गुटखा पुड्यांच्या सेवनाचा जो दुष्परिणाम मला भोगावा लागत आहे अशी वेळ कोणावरही येवू नये अशी अल्हाहकडे प्रार्थना करतो तरुणांनी गुटखा पुड्यांसह तंबाखू सेवनाच्या आहारी जावून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचे जिवन उध्वस्त करून घेऊ नये असा मोलाचा संदेश ही सय्यद गौस यांनी दिला आहे.

💥कँन्सरग्रस्त सय्यद गौसला 'पेट स्कॅन' साठी आवश्यकता आहे आर्थिक मदतीची :-


गुटखा पुड्यांच्या व्यसनामुळे संपूर्ण जिवन उध्वस्त झालेल्या सय्यद गौस यांना व त्यांच्या कुटुंबाला आज आवश्यकता आहे मासकीचा आधार देण्याची परंतु त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यास कोणीही पुढे येण्यास तयार नाही स्वतःसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी नाईलाजास्तव सय्यद गौस यांना त्यांचा ८ वर्षीय मुलगा शाहबाज याला हाताखाली घेऊन चिकनशॉप चालवावे लागत आहे. राज्यात गुटखा बंदी कायदा लागू असतांनाही प्रचंड प्रमाणात मानवी जिवनास घातक असलेल्या प्रतिबंधीत अवैध विषारी गुटखा पुड्यांची निर्मिती व राजरोसपणे विक्री होत असल्यामुळे सय्यद गौस सय्यद रसुल सारख्या असंख्य तरुणांचे उभे आयुष्य उध्वस्त होत असल्यामुळे यास अवैध गुटखा तस्कर विक्रेत्यांसह अन्न व औषधी प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी सुध्दा जवाबदार असून या पापाची फळ यांना सुध्दा भोगावीच लागणार आहे.

सय्यद गौस याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत त्याला डॉक्टरांनी 'पेट स्कॅन' करण्यासाठी सांगितले आहे परंतु पेट स्कॅन करण्यासाठी १२ हजार रुपयांची आवश्यकता आहे या संदर्भात त्याने स्वतः आ.रोहितदादा पवार यांच्या मदत केंद्राशी संपर्क साधून आर्थिक मदती संदर्भात मागणी केली असता संबंधित केंद्रातील डॉक्टरांनी आर्थिक मदत देण्यास नकार दिला असला तरी ही 'पेट स्कॅन' करतेवेळी संबंधित पेथॉलॉजिस्टला बोलून फिस कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असले तरीही सय्यद गौस यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे ते पेट स्कॅन करू शकत नाही ज्यांना त्यांना आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे अश्या दानशुर व्यक्तींनी त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खाते क्र.39989254282 आयएफएससी कोड (एसबीआयएन 0004561) या खात्यात किंवा फोन-पे क्र.9860862733 या नंबरवर आर्थिक मदत पोहोचवावी असे आवाहन सय्यद कुटुंबाने केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या