💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट.....!


💥मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात अवकाळीचा फटका ; बळीराजा चिंतेत💥

✍️ मोहन चौकेकर

1.  गिरीश महाजन आणि जनक व्यास यांना हायकोर्टाचा दणका, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीविरोधातील याचिका फेटाळली, बारा लाखांची अनामतही जप्त 

2. आदेश देऊनही विधानपरिषदेच्या 12 नामनिर्देशित सदस्यांची निवड नाही, हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं; उच्च न्यायालयाचे ताशेरे 

3. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडलं , उद्धवजी, तेव्हा बाळासाहेबांना काय उत्तर देणार?, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल 

4. पेनड्राइव्ह बॉम्ब प्रकरण: विरोधी पक्षनेत्यांची विनंती गृहमंत्र्यांकडून मान्य, गुरुवारी करणार निवेदन

5. चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा संप उद्या गुरुवारी मिटण्याची शक्यता,  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा 

6. फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्त्युत्तर, केंद्रीय यंत्रणांच्या मदतीशिवाय सव्वाशे तासांचं चित्रण अशक्य असल्याच मत, सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर 

7. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4575 रुग्ण, 145 जणांचा मृत्यू , राज्यात मंगळवारी 460 रुग्णांची नोंद तर पाच जणांचा मृत्यू  

8. मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात अवकाळीचा फटका, बळीराजा चिंतेत, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत 

9.New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, मांकडिंग वादावर पडदा; MCC ने अनेक नियम बदलले 

10.Beed Crime News : चोरांचा पोलिसांनाच हिसका, घरातून 1 लाखांहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल लंपास बीड जिल्ह्यातील घटना

11.कमी उत्पन्नामुळे शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; भंडाऱ्यातील शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या