💥पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट कर्मचाऱ्याने स्वतःला अधिकारी दाखवून दिले कामगारांचे अनेक बोगस अनुभव प्रमाणपत्र....!


💥प्रभारी मुख्याधिकारी बि.नितीशकुमार यांनी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश💥

पुर्णा (दि.१९ मार्च) - पुर्णा नगर परिषद प्रशासनात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांनी विविध शासकीय योजनांमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे अफरातफर करून अनेक शासकुय योजनांची सोईस्कररित्या वाट लावल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अश्या झारीतील शुक्राचार्यांच्या दुष्कृत्यांवर वेळोवेळी पांघरून टाकण्याचा सपाटा लावल्यामुळे या झारीतील लाचखोर भ्रष्टाचाऱ्यांची हिंमत कमालीची वाढल्याचे निदर्शनास येत असून आतातर या निरंकूष झालेल्या भ्रष्टाचाऱ्यांनी चक्क नगर परिषदेच्या शिक्क्यांसह अन्नाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था फुलकळस तालुका पुर्णा जि.परभणी रजि.नं.पि.बी.एन/पि.आर.एन/जी.एन.एल/२०/२०१८ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधव दुधगोंडे यांची कुठलीही पुर्व परवानगी न घेता बोगस शिक्के तयार करून ९० दिवस कामाचे कामगाराचे बोगस प्रमाणपत्र जिल्हा कामगार अधिकारी,जिल्हा कामगार कार्यालय परभणी यांच्या नावे प्रती कामगार १००/२०० रुपये घेऊन दिल्याचे उघडकीस आले असून या संदर्भात संबंधित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दुधगोंडे यांनी पुर्णा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार नितीशकुमार बोलेलू यांना रितसर लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर मुख्याधिकारी बोलेलू यांनी जिल्हा कामगार अधिकारी श्री.विद्याधर मानगावकर यांना दि.८ मार्च २०२२ रोजी लेखी स्वरूपात पत्र पाठवून पुर्णा नगर परिषदे मार्फत जिल्हा सरकारी बांधकाम कामगार कार्यालयात सादर केलेले कामगार प्रमाणपत्र बोगस असल्याचे म्हटले असून नगर परिषदेचा अभिलेख तपासल्यानंतर सदरील बाब उघडकीस आल्याचे म्हटले आहे.


 पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या शिक्क्याचा गैरवापर करून तसेच अन्नाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचा बोगस शिक्का बनवून अश्या प्रकारे असंख्य बोगस बांधकाम कामगारांना नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट झारीतील शुक्राचार्यांनी बोगस प्रमाणपत्र बहाल करून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी साठी शासनाने कार्यान्वित केलेल्या योजनेचा सोईस्कररित्या बोगस कामगारांचा भरणा करून बट्याबोळ केला जात असल्यामुळे या योजनेपासून खरे बांधकाम कामगार वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे नगर परिषद पुर्णा मार्फत देण्यात आलेल्या बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्रावर नगर परिषद अधिकारी म्हणून नगर परिषदेत स्वच्छता निरिक्षक पदावर कार्यरत नईम खान छोटे खान यांचे नाव असून संबंधित प्रमाणपत्रावर मुख्याधिकारी म्हणून स्वाक्षरी मारण्यात आली आहे या संदर्भात स्वच्छता निरिक्षक नईम खान यांच्याशी भ्रमण ध्वनीवर संपर्क साधला असता तो मी नव्हेच ? या आवेशात नईम खान यांनी याच कार्यालयातील ओएस नंदलाल चावरे यांनी सदरील प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे.एकंदर आतापर्यंत २६ बोगस प्रमाणपत्र हाती लागले असून अश्या प्रकारे असंख्य बोगस बांधकाम प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सखोल चौकशी अंती उघडकीस येईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या