💥पुर्णेत भारतीय जनता पार्टीला चार राज्यात मिळालेल्या प्रचंड यशा बद्दल जल्लोश....!


💥भाजप कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून,फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप💥

पुर्णा (दि.१० मार्च) भारतीय जनता पार्टीला चार राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या प्रचंड यशा बद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दि.१० मार्च रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

पुर्णा शहर भाजपाच्या वतीने देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यातील मतदानाचा कौल हा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या रुपात दिल्याबद्दल,तसेच देशातील सर्वात मोठे असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल ह्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून,फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष प्रशांत कापसे, तालुकाध्यक्ष आनंतराव पारवे,डॉ. अजय ठाकूर( जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा), विजय कराड( जिल्हा संयोजक )युवा मोर्चा शहरअध्यक्ष विश्वनाथ होळकर बालाजी कदम,भारत एकलारे,राम पुरी, वैभव भायेकर, साई होळकर, हरीभाऊ सातपुते, प्रभाकरसेठ कोत्तावार इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या