💥वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम महाजीविका अभियानाचा शुभारंभ...!


💥जागतिक महिला दिनानिमित्त महाजीविका अभियानाचा शुभारंभ करण्यात आला💥

फुलचंद भगत

वाशिम:-ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करून महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्वयंसहायता समूह ग्राम संघ प्रभाग संघ उत्पादक गट शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत महिलांना शाश्वत उपजीविका चे स्त्रोत व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू यांना तालुका जिल्हा व राज्य स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच शाश्वत समुदाय स्त्रिया संस्था निर्माण करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 8 मार्च रोजी स्वातंत्र्य दिन दिनांक 15 ऑगस्ट 2022 या दरम्यान कालबद्ध पद्धतीने महाआजीविका  अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाजीविका अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.


                 उमेद अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान ग्राम विकास मंत्री  महाराष्ट्र राज्य हसन मुश्रीफ , अब्दुल सत्तार साहेब राज्य ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच  राजेश कुमार अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य  हेमंत वसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद मुंबई  परमेश्‍वर राऊत मुख्य परिचलन अधिकारी उमेद, यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडला त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा वाशिम द्वारे जिल्हा परिषद सभागृह मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील महाआजीविका अभियानाचा शुभारंभ वसुमना पंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून या वेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील निकम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वाशिम उपस्थित होते तसेच  सुधीर खुजे जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद वाशिम व  अभियानतील सर्व अधिकारी कर्मचारी आदी व्यक्तींच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले

सदर अभियान द्वारे जिल्हयामध्ये अधिकाधिक उपजीविका निर्माण करण्याचे आव्हान सर्व अधिकारी व कर्मचारी उमेद यांना प्रकल्प संचालक यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या