💥बोगस डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा....!

 

 

💥कांग्रेस तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांची मागणी💥

जिंतूर /बी.डी.रामपूरकर

जिंतूर:  तालुक्यातील मौजे ब्राम्हणगांव पाटी ते ब्राम्हणगांव गावापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण अतिशय बोगस पद्धतीने झाले आहे. सदरील बोगस डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदार व अभियंता कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी कांग्रेस तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

                  ब्राम्हणगांव पाटी ते ब्राम्हणगांव गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. सदरील रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्ता डांबरीकरणाचे काम तर सुरू करण्यात आले मात्र कंत्राटदाराने रस्ता डांबरीकरणाचे कोणतेही नियम न पाळता थेट मातीवर अल्पशा प्रमाणात डांबर टाकून अतिशय निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केले आहे. रस्त्यावर केवळ एक इंच थर अंथरण्यात आल्याने पुढील काही दिवसातच रस्ता जैसे थे होण्याची चिन्हे दिसत आहे. म्हणून जिल्हा परिषद कार्यालयामार्फत सदरील बोगस कामाची सखोल चौकशी करून कंत्राटदार, अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व रस्ता डाबरीकरणाची देयके अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी कांग्रेस तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या