💥प्रत्येक यशस्वी स्त्रीला खंबीर पुरुषाची साथ हवीच - निर्मलाताई विटेकर


💥जागतिक महिला दिना निमित्त आनंद नगरी व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रसंगी बोलतांना केले त्यांनी प्रतिपादन💥


सोनपेठ (प्रतिनिधी):-

सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा येथे जागतिक महिला दिनानिमित्त आनंद नगरी व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला काकी विटेकर तर प्रमुख पाहुणे गट शिक्षण अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती, 


कार्यक्रमाची सुरुवात आरंभ ढोल ताशा पथक यांनी मान्यवरांना वाजवत उद्घाटन स्थळी घेऊन आले, निर्मला काकी विटेकर यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, केंद्रीय कन्या शाळेच्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका, पालक महिला व विद्यार्थिनी आदींचे जागतिक महिला दिनानिमित्त निर्मला काकी विटेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी बोलताना निर्मला काकी विटेकर यांनी प्रत्येक यशस्वी स्त्रीला खंबीर पुरुषाची साथ हवीच यावेळी स्वर्गीय माजी आमदार उत्तमरावजी विटेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर व माजी नगरसेवक अॕड.श्रीकांत विटेकर यांच्या खंबीर साथ होती म्हणून मी आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून वावरते असा स्वतःचा अनुभव सांगितला, शौकत पठाण यांनी मनोगत व्यक्त करताना स्त्री ही आई आहे येथे जमलेल्या सर्व मातांना आपल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी आपण लक्ष द्यावे आपण जिजाऊ व्हा सावित्री व्हा व मुला मुलींना घडवा असे आवाहन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या