💥शेतकऱ्यांची बेकायदेशीररित्या होत असलेली कट्टीची वसुली तात्काळ थांबवा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी - परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या अडत व्यापाऱ्यांकडून शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून बेकायदेशीररित्या कट्टी वसुल करुन शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. कृषी माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टीवर काटा केल्यानंतरही वजनाचे ग्राममध्ये येणारे वजन गृहीत धरले जात नाही तसेच एक क्विटल मालामागे सरसगट ८०० ते ९ ०० ग्राम वजन कट्टी म्हणून कमी केले जात आहे व शेतकऱ्यांना स्पष्टपणे कट्टी काटली असे सांगण्यात येत आहे ही एक गंभीर बाब आहे.

हा प्रकार एकट्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होणाऱ्या खरेदी मध्ये सुरू आहे अस नाही तर हा प्रकार जिल्ह्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुरू आहे आणि या बेकायदेशीर वसुलीचा गोरखधंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुक संमतीने सुरू आहे. या प्रकरणी अनेक शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारीची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. मंगेश सुरवसे यांची भेट घेऊन जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेली बेकायदेशीर कट्टी वसुली रोखण्यास पुर्णतः असमर्थ ठरलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बाजार समिती अंतर्गत व्यवसाय करणाऱ्या अडत व्यवसायकांची  चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी तसेच बेकायदेशीर कट्टी वसुली तात्काळ थांबवून सामान्य शेतकर्यांना न्याय द्यावा या मागणी चे निवेदन देण्यात आले.

कट्टी हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागील वर्षी कट्टी वसुली संदर्भात अडत दुकानदाराच्या पावती पुराव्यासह तक्रार दिली होती. तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणी चौकशी लावली होती. त्या नंतर काही काळासाठी कट्टी वसुली थांबली होती परंतू पुन्हा परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकाखाली शेतकरी लुटीचा हा गैर प्रकार चालू आहे. या बाबत अनेक शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे तक्रारी केलेल्या आहेत.

कट्टी पूर्णतः बंद करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालय व परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे केले जाईल व त्यावेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतः जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवते, मिडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग इत्यादींच्या सह्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या