💥पुर्णेत मोफत शिवभोजन थाळी व शिवभोजन हेल्पलाईन उदघाटन तहसिलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या हस्ते संपन्न...!


💥यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना मा.शहरप्रमुख बंटी कदम यांची उपस्थिती💥 


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पुर्णा शहरातील आज डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण संचलित शिवभोजन केंद्र येथे मोफत शिवभोजन थाळी व शिवभोजन हेल्पलाईन शुभारंभ पुर्णेच्या तहसिलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना मा.शहरप्रमुख बंटी कदम, दै.सामनाचे दौलत भोसले,विद्याप्रसारणी शाळेचे मुख्याध्यापक हिंगणे सर, तहसिल पुरवठा विभागाचे जाधव साहेब, नायब तहसिलदार मस्के साहेब, मुन्नाभैय्या राठौड, शिवप्रसाद ठाकुर सर, वैभवअण्णा कुऱ्हे, पब्लिक न्युजचे नारायण सोनटक्के, सावरमल सेठ अग्रवाल, बापुराव बोकारे,व इतर उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे आयोजक तथा डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मोहन गुंजकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे यावेळी स्वागत केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या