💥'आई ' राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन : सम्राट टाइम्सचा उपक्रम...!


💥निवडक कवितांना सम्राट टाइम्स कडून विशेषांकात स्थान देण्यात येणार आहे💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-बहुजनांच्या न्याय हक्काचं शस्त्र असलेले सम्राट टाइम्स वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कालकथित जिजाई ज्ञानदेव तायडे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम क्रमांक ₹३००१ रुपये,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र,द्वितीय क्रमांक ₹२००१ रुपये,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,तृतीय क्रमांक ₹१००१ रुपये,स्मृतिचिन्ह,सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.१० उत्कृष्ट कवितांची 'जिजाई 'पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.निवडक कवितांना सम्राट टाइम्स कडून विशेषांकात स्थान देण्यात येणार आहे.

सहभागी सर्वच स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. काव्यस्पर्धा निःशुल्क आहे. तरी कवी कवियत्रीनी राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी 'आई' या विषयावर स्वरचित,अप्रकाशित १ कविता,स्वतःचा १ फोटो आदी साहित्य vinod.tayde6565@gmail.com या मेल आयडीवर दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत पाठवावे अधिक माहितीसाठी  8888277765 किंवा 9563645555 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विनोद तायडे संपादक सम्राट टाइम्स यांनी केले आहे.


प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या