💥चाळीस किमी सायकल चालवुन शिवरायांना अभिवादन : सर्व क्षेत्रातील नागरीकांचा सहभाग....!


💥वाशिम सायकलस्वार ग्रुपचा उपक्रम💥

फुलचंद भगत

वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम सायकल ग्रुपच्या आयोजनातून व जायंट सायकल क्लब उपक्रमांतर्गत सायकलप्रेमींनी वाशिम ते रिठद व परत रिठद ते वाशिम अशी ४० किलोमिटर सायकल चालवून शिवरायांना आगळेवेगळे अभिवादन केले.

 या उपक्रमात शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, पोलीस कर्मचारी, लेखाधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, युवक, युवती आदी सायकलप्रेमींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या मोहीमेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आला. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी वाशिम सायकलस्वार ग्रुपचे आदेश कहाते व चेतन शर्मा यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या