💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात राजकीय दडपशाहीचा नग्न तांडव ; बोर्डीकर व भांबळे गटात धुमश्चक्री...!


💥दोन्ही गटात सिनेस्टाईल हाणामारीसह तुफान दगडफेक ; व्यापारी वर्गासह जनसामांन्यांत दहशतीचे वातावरण💥

✍️बाळासाहेब रामपुरीकर

परभणी (दि.२७ फेब्रुवारी) - जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर आज रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे या दोघांसह समर्थकांत सिनेस्टाईल तुफान हाणामारी झाली यावेळी दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर तुफान दगडफेकही केली या घटनेमुळे संपूर्ण शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले .

जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज रविवारी सकाळ पासून मतदान  सुरू होते, यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे हे दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते. यावेळी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत का आलात ? असे म्हणून बोर्डीकर व भांबळे यांच्यात वादविवाद सुरू झाला बाचाबाची झाली,हमरीतुमरीवर प्रकरण गेले, शिवीगाळ झाली पाठोपाठ दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले,, त्याचा परिणाम समर्थकही एकमेकांवर भिडले,तब्बल पंधरा मिनिटे या दोन्ही गटात मोठी धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक झाली. जिंतूर पोलीसांनी तातडीने ताफा मागून लाठीमार करीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले दरम्यान या प्रकाराने जिंतूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला त्यामुळे जिंतूर शहरात आज राजकीय दडपशाहीचा नग्न तांडव पाहावयास मिळाला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या