💥राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने केलेली कारवाई तत्काळ मागे घेण्यात यावी....!


💥जिंतूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी💥

जितूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.२५ फेब्रुवारी) - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर  केंद्रसरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ईडीने सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे ती तत्काळ मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिंतूरच्या वतीने तहसीलदार जिंतूर यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. 

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्यावर  केंद्रसरकारच्या इशाऱ्यावर ईडीने सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे. नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकार मधील महत्वपूर्ण नेतृत्व आहेत तसेच ते अल्पसंख्यांक व औकाफ विकास मंत्री असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांनी आजपर्यंत भाजपचे अनेक वाईट कृत्य जनतेसमोर आणल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी  केंद्रातील भाजप सरकार यांनी महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करून राज्य सरकारवर दबाव टाकत आहे. ईडीची हि कारवाई सूडबुद्धीने केलेली असून त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने होत आहेत. आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष नवाब मलिक  यांच्या पाठीशी आहोत.  तसेच ईडी व केंद्र सरकाचा या निवेदना द्वारे जाहीर निषेध केला आहे.

तसेच नवाब मलिक यांच्यावर केलेला खोटा गुन्हा तत्काळ मागे घेण्या बाबत केंद्र शासनाला कळविण्यात यावे तसेच नवाब मलिक यांच्यावर केलाला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावे या आशयाचे एक निवेदन तहसीलदार यांना तहसील कार्यालय जिंतूर येथे देण्यात आले, या वेळी भाजप सरकारच्या विरीधात प्रचंड रोष व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यात आला तर  नवाब मलीक  तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा घोषणांनी परिसर दणाणूण गेला. 

या निवेदनावर  मा.आ.विजय भांबळे यांच्यासह जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प.सभापती रामराव उबाळे, विधान परिषद अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, जि.प.सदस्य विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे,  पं.स.सभापती गणेशराव ईलग, उप.सभापती शरद मस्के, तालुकाध्यक्ष रा.कॉ. मनोज थिटे, प.स.सदस्य मधुकर भवाळे, प्रकाश शेवाळे, विअजय खिस्ते, किरण दाभाडे, बाबाराव ठोंबरे, सुभाष  घोलप, दिलीप डोईफोडे, बालासाहेब गायकवाड, मुंजाभाऊ  तळेकर, संतोष भवाळ,न.प.उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, न.प.सदस्य मनोहर डोईफोडे, श्यामराव मते, उस्मान पठाण, शेख इस्माईल, शोएब जानिमिया, शाहेद बेग मिर्झा, दलमीर खान पठाण, सोहेल सर, दत्तराव काळे, संजय निकाळजे, लखुजी जाधव, चंद्रकांत बहिरट, आहेमद बागबान, शौकत लाला, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व सेल चे पदाधिकारी व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या