💥पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभान पवार महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी...!


💥यावेळी प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले💥

पूर्णा (दि.१९ फेब्रुवारी)- येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच यावेळी प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांनी  छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी  प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या