💥राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रीय काँग्रेस कडुन निषेध...!


💥राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आज शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले💥

जिंतूर प्रतीनिधी / बी.डी. रामपूरकर

 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याचा निषेध करीत जिंतूर राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आज शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी रोजी जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

 निवेदनात म्हटले आहे की , बुधवारी सक्तवसुली संचालनालय ( इ.डी. ) च्या अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर पहाटे ५ वाजता अचानक धाड टाकून श्री मलिक यांना  कोणताही समन्स न देता राजकीय द्वेषापोटी लोकशाहीचा गळा दाबत आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्ड्रिंग )प्रकरणी चौकशी करायची असल्याचे सांगून त्यांना अटक केली ती असंवैधानिक व हुकूमशाही प्रवृत्तीची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 त्यांना अटक केले  मंत्री मलिक यांच्यावर झालेली ही कार्यवाही राजकीय हेतूने करण्यात आली असून या कार्यवाहीसाठी जी प्रक्रीया अवलंबविण्यात आली ती अत्यंत निंदनिय व सुड बुध्दीची असून त्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे . नवाब मलिक हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत.  नवाब मलिक मंत्री जर दोषी असते तर वर्ष 2014 पासून आजपर्यंत केंद्रात भा.ज.पा. चे सरकार आहे . सन 2014 पासून आजवर मलिक यांच्यावर कार्यवाही झाली असती. परंतु आता करण्यात आलेली कार्यवाही म्हणजे राज्यात महाविकास आघाडीची सरकारची स्थापना आणि मलिक यांनी एन.सी.बी.तील भ्रष्टाचार समोर आनल्याने भा.ज.पा. च्या नेत्यांनी इ.डी. ला हाताशी धरून करण्यात आलेली राजकीय कुरघोडी आहे. ही कार्यवाही बनावट आणि राजकीय हेतूने करण्यात आली असल्यानेच महाराष्ट्रा सारख्या प्रगत आणि उज्वल परंपरा असलेल्या राज्याच्या एका प्रतिष्ठित मंत्र्यास अगदी एखाद्या सराईत गुन्हेगारास सापळा रचुन पकडावे तसे अटक केले गेले आहे. केंद्रीय संस्थांची राज्यासोबतची ही वागणुक चुकीची आहे म्हणून या कार्यपध्दतीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, अविनाश मुंजाजी काळे (जिल्हा परिषद सदस्य), तालुका अध्यक्ष गणेश काजळे, बसू लाला, मोहसीन खान, मुसा कुरेशी, केशवराव अर्जुनराव बुधवंत( प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस), नागसेन भेरजे (प्रदेश उपाध्यक्ष युवक कांग्रेस महाराष्ट्र), राजा भाऊ नागरे, रामेश्वर घुगे, प्रदीप चव्हाण, फिरोज कुरेशी, रहमान भाई लाडले, मुन्ना सर, कृष्णा टाकरस, इरशाद पाशा, रावसाहेब खंदारे तहसील देशमुख, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या