💥छञपती संभाजी राजे मिञ मंडळाकडुन शिवरायांची जयंती साजरी...!


💥यावेळी अन्नदान करुन विविध सामाजिक ऊपक्रम साजरे करत शिवरायांना अभिवादन करण्यात आले💥

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर शहरातील संभाजी नगर येथील छञपती संभाजी राजे मिञ मंडळाने स्वराज्यसंस्थापक छञपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी केली.संजय ठाकुर आणी मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन केले तर यावेळी अन्नदान करुन विविध सामाजिक ऊपक्रम साजरे करत शिवरायांना वंदन केले.

       छञपतींचे विचार घराघरात पोहचवावे आणी समाजातील अठरापगड जातींना जोडुन लोकांना लोकांना एकसंघ बनवन्याची प्रेरणा शिवरायांकडुन घ्यावी असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले.युवकांनीही छञपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणामधून प्रकाश टाकला.यावेळी राम ठाकरे,संजय ठाकुर,पृथ्वीराज ठाकूर,जगदिश भुसारी,गजानन धानोरकर,मयुर थोंबे,धिरज ठाकुर,मो.राशिद,गजानन झंझाड,प्रविण मस्के,आलोक पांडे,आकाश दाभाडे,विशाल पांडुळे आदीसह परिसरातील नागरीकांची ऊपस्थीती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या