💥वाशिम जिल्हा पोलिस दल जनतेच्या सुरक्षिततेसाठी कटिबध्द ; दरोडेखोरांवर मोका...!


💥जिल्हयात दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त करुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश💥

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक सो श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारीवर आळा बसविला असुन अधिकाअधिक कारवाई करुन पोलीसांचा खाक्या नमुद आरोपीना दाखविला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वाशिम शहर येथुन वारंवार मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या आरोपींताची यादी बोलावुन ईश्वर उर्फ लखन रामभाऊ पायघन वय ३५ वर्षे याचेवर असलेल्या गुन्हयाचा बारकाईने तपास करण्याबाबत तसेच लगतच्या जिल्हयात दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त करुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश निर्गमीत केले.

     वाशिम शहरातील लुटमार करणारा कुख्यात ईश्वर लखन भाऊ पायघन हे त्यांच्या साथीदारांसह जिल्हयातील वेगवेगळया भागात दुकानाचे शटर वाकवुन,रस्त्यात लोंकाना चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्या साथिदारासह करीत असल्याने त्याच्या वाढत्या समाजविघातक कृत्यावर आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी पोलीस निरीक्षक रफिक चाँदसाहेब शेख यांना उच्च प्रतिची व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यास आदेशीत केली. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक रफिक चाँदसाहेब शेख यांनी सदर गुंडा विरुद्ध मोका कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधिक्षक सो यांना सादर केला.पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपन ३८/२०२२ कलम ३९५ भादवी अन्वये दिनांक १३/०१/२०२२ रोजी दाखल झाला असुन यातील आरोपीने त्यांचे साथीदारसह फिर्यादी नामे किशन शशिकांत देवणी वय ३६ वर्षे रा डि ३० माधव नगर, लाखाळा ता.जि वाशिम यांचे घरी ते हजर नसताना त्यांची वयोवृध्द आई सायंकाळी ०७.०० चे दरम्यान घरी टिव्ही पाहत असताना ४ ते ५ इमस धारदार शस्त्रांनी घरात घुसले चोरीच्या ऊददेशाने घरातील पलंगाची तोडफोड केली, घरात आलेल्या दुधवाल्याने ओरडा आरडा केल्याने घरात टेबलवर असलेला मोबाईल किंमत १८०००/- घेऊन तेथुन पळुन गेले.सदर गुन्हयाचे तपासात असे निष्पन्न झाले की, टोळी प्रमुख ईश्वर उर्फ लखन रामभाऊ पायघन हा गुन्हयातील आरोपी व इतर नवनवीन आरोपीसोबत मिळुन स्वत:चे व टोळीतील सदस्यांचे आर्थिक फायदयासाठी व टोळीचे वर्चस्व गाजविण्यासाठी गुन्हे करीत असुन मागील १० वर्षात बेकायदेशीर शस्त्राचा वापर करुन जिवे मारण्याची धमकी देवुन धाकदपदशा,दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, जिवे ठार मारणे,शस्त्र व अग्नीशस्त्र बाळगणे, चोरी,घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न,दंगाकरणे जुलुम जबरदस्ती,दहशत निर्माण करणे, हिंसाचार करणे अशाप्रकारचे कृत्य केलेले आहेत.सदर टोळीप्रमुख ईश्वर लखन भाऊ पायघन व त्याचे इतर साथीदार नामे विठठल काशराम पायघन,.पुंजाजी किसन इढोळे उर्फ मामा, रतन हरीभाऊ पायघन, पिंटु उर्फ हनुमान पायघन या पाच आरोपीता विरुध्द लगतचे बुलढाणा व वाशिम जिल्हयात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने श्री. बच्चन सिंग वाशिम यांनी पोस्टे वाशिम शहर येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा बारकाईने तपास करण्याबाबत तसेच लगतच्या जिल्हयात दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त करुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश निर्गमीत केले.

 त्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिलकुमार बन्सीलाल पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी,वाशिम विभाग यांचे नेतृत्वात पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोमनाथ जाधव,सपोनि अतुल मोहनकर, पोलीस उपनिरिक्षक पठाण,ठाणेदार वाशिम श्री.रफिक चॉदसाहेब शेख,पोह घुगे, पोना राजेश गिरी, पोना प्रशांत राजगुरु यांनी अहोरात्र मेहनत घेवुन गुन्हेगारांचे संबंधीत जिल्हयातील पोलीस स्टेशन कडुन रेकार्ड हस्तगत करुन प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती, परिक्षेत्र, अमरावती यांना सादर केला. मा. विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती यांनी सदर गुन्हयात मकोका कायदयान्वये कारवाई करण्याचे आदेश निर्गमीत केल्याने वाशिम जिल्हयात मकोका कायदयाअंतर्गत तिसरी कारवाई करण्यात आली. त्यांची अशाप्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचे असल्याने या टोळी विरुध्द या गुन्हयात कलम ३(१)३(२),३(४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये मकोका लावण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास श्री. सुनिलकुमार बन्सीलाल पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी,वाशिम विभाग,जि. वाशिम हे करीत आहेत.

जनतेच्या सुरक्षिततेसाठी वाशिम पोलिसदल कटिबध्द ;-

जनतेच्या सुरक्षिततेसाठी वाशिम पोलीस कटीबध्द असुन मागील ५ महिन्यात एमपीडीए कायदयाअंतर्गत ४ इसमांवर कारवाई करण्यात आल्या तर मागील एका महिन्यात ११ लोकांचे तडीपार आदेश प्राप्त करण्यात आले आहेत.मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वाशिमकर जनतेस असे आवाहन केले आहे की, वाशिम जिल्हयात गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक बसणे गरजेचे असुन,अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या

व्यक्ती गुन्हेगारांना मदत करणारे इतर गुन्हेगार यांचे वर्तमाना बदल न झाल्यास अशा गुन्हेगार/टोळीवर अशच प्रकारची कठोर कारवाई करण्यता येईल, याची गंभीर दखल ज्या व्यक्ती अशा टोळया चालवितात, त्यांना पाठबळ देतात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी घ्यावी तसेच जनतेनेही अशाप्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या व्यक्ती टोळया बाबतची माहिती पो.नि सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना देण्यात यावी....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या