💥पुर्णा नगर परिषदेकडून कोट्ट्यावधी रुपयांच्या निधीतून बनवलेला मुख्य रस्ता देत आहे भ्रष्ट कारभाराची साक्ष...!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या चौकशी आदेशा नंतरही चौकशी अहवाल गुलदस्त्यात💥 


पुर्णा (दि.२३ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहराला जोडणाऱ्या झिरो टी पॉईंट ते नरहरी महाराज चौक या रस्त्याचे मागील तिन महिण्या पुर्वीच कोट्ट्यावधी रुपयांच्या निधीतून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते सदरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे अर्थात दर्जाहीन होत असल्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांनी ११ आक्टोंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी गोयल यांनी दि.१८ आक्टोंबर २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के.एस.सोनवणे यांना जा.क्र.२०२१/संकीर्ण/कावी ११६९ द्वारे लेखी स्वरूपात चौकशी आदेश देऊन चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले होते यावर उपविभागीय अभियंता सोनवणे यांनी जवळपास महिनाभराच्या कालावधी नंतर दि.११ नोव्हेंबर २०२१ रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामा संदर्भातील सर्व कागदपत्र मागवली होती परंतु नंतर मात्र या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचा अहवाल मात्र अद्याप पर्यंत गुलदस्त्यातच राहिल्याने या बोगस डांबरीकरणाच्या कामाचे पित्तळ अत्यल्प कालावधीत अवघ्या तिन महिण्यात हळुवारपणे उघडे पडण्यास सुरूवात झाली आहे.


पुर्णा शहराला जोडणारा झिरो टी पॉईंट ते नरहरी महाराज चौक हा मुख्य हॉटमिक्स (डांबररोड) रस्ता नगर परिषद प्रशासनाकडून कोट्ट्यावधी रुपयांच्या निधीतून अवघ्या तिन महिण्यापुर्वी आक्टोंबर महिण्यात तयार करण्यात आला होता यावेळी संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याच्या अनेक तक्रारी जागृक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या परंतु राजकीय क्षेत्रासह प्रशासनातील भ्रष्ट बेईमानांच्या मजबूत साखळी समोर सर्वच तक्रारींसह जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या तक्रारीला ही केराची टोपली दाखवत पहाता पहाता बोगस रस्त्याचे काम पुर्ण करून कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावण्यात आली ज्याचा परिणाम अवघ्या तिनच महिण्यात शहरातील नागरिकांना पाहावयास मिळाला असून उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच या रस्त्यावरील बोगस डांबर वितळण्यास सुरूवात झाली असून या डांबराचे अक्षरशः चिखल झाल्याचे दिसत असून यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्यात आलेले हे डांबरच आहे की वंगन असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित होत असून कोट्ट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून बनवण्यात आलेल्या सदरील रस्त्याचे बोगसकाम नगर परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराची उघड साक्ष देत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या