💥परभणी जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ ए.एम.देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद...!

 


💥जिल्ह्यातील पुर्णा तालुका वगळता सर्वत्र मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकारांनी केली साजरी💥


राज्यात प्रथमच यावर्षी शासकीय पातळीवर मराठी पत्रकारीतेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१० वी जयंती रविवार दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात शासकीय पातळीवर साजरी करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


महाराष्ट्र सरकारने पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्या नंतर मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा महनिय व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करून २० फेब्रुवारी रोजी दरवर्षी शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला काल रविवार असल्यामुळे तहसिल कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली नाही ज्या प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी नसते अश्या कार्यालयात मात्र बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आलीच नाही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील मराठी पत्रकार परिषदे अंतर्गत काम करणाऱ्या पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुका वगळता परभणी शहरासह सर्व तालुक्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी थाटात जयंती साजरी केली.पुर्णा शहरातील श्री.गुरुबुध्दी स्वामी महाविद्याल तसेच साने गुरूजी सार्वजनिक वाचनालय व तालुक्यातील ताडकळस येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.💥पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना पडला आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीचा विसर ? 

राज्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१० वी जयंती उत्साहाने साजरी होत असतांना मात्र संपूर्ण जिल्ह्यात निर्भीड पत्रकारीतेत अग्रस्थानी असलेल्या पुर्णा तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा विसर पडावा यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती ? अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केलेल्या आवाहना नंतर ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जयंती साजरी करण्यास पुढाकार का घेतला नाही ? असा प्रश्न तालुक्यातील पत्रकारांमध्ये उपस्थित होत आहे.... 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या