💥पुर्णा तालुक्यातील श्री.कंठेश्वर संगमावर महाशिवरात्री निमित्त श्री.कोठेश्वर यात्रा महोत्सव...!


💥महाशिवरात्री दिनी जागृत देवस्थान श्री कोठेश्वर महादेवाला करण्यात येणार मान्यवरांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक💥

पुर्णा : तालुक्यातील कंठेश्वर येथील पवित्र गोदावरी-पुर्णा नदीच्या संगमावर असलेल्या जागृत देवस्थान श्री.कोठेश्वर महादेव देवस्थानात मंगळवार दि.१ मार्च ते २ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवरात्रीच्या दिवशी मंगळवार दि.१ मार्च रोजी पहाटे ०५-०० ते ०६-३० वाजेच्या सुमारास श्री.कोठेश्वर महादेवाला रुद्राभिषेकासह बिल्वार्चन आरती तसेच श्री.आदर्श कोठेश्वर मित्र मंडळाकडून अभिषेक तर सकाळी ०८-०० ते ११-०० वाजेच्या सुमारास सामुहिक शिवलिलामृत पारायन दुपारी १२-०० ते ०२-०० वाजेच्या सुमारास श्री.आदर्श कोठेश्वर मित्र मंडळाकडून श्री.हभप.बाळू महाराज गिरगावकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून यानंतर भाविक भक्तांना फलहार वाटप करण्यात येणार असून यानंतर सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास दिप दान व आरतीचे आयोजन तर रात्री ०८-०० ते प्रातः ०५-०० वाजेपर्यत अभिषेक व होमहवन करण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी बुधवार दि.०२ मार्च २०२२ रोजी श्री.संभाजी देवराव कऱ्हाळे पारवा यांच्या वतीने महाप्रसाद पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.


तालुक्यातील कंठेश्वर येथील श्री.कोठेश्वर महादेव संगम तिर्थक्षेत्र हे अतिशय प्राचिन ऐतिहासिक तसेच संत-महंत अन् भक्तांच्या श्रध्देचे पुण्यमय जागृत देवस्थान असून प्रतिवर्षी शिवरात्रीला श्री.कोठेश्वर महादेव यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते व या जागृत देवस्थान असलेल्या कोठेश्वर महादेवाच्या दर्शनाला असंख्य भाविक भक्त आवर्जून येत असतात परंतु मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशासह राज्यात कोरोना महामारीची परिस्थिती असल्यामुळे यात्रा भरली नाही परंतु यावर्षी मात्र परिस्थिती बदल्यामुळे महाशिवरात्री दिनी यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव,गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे,परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूल पाटील,पाथरी मतदार संघाचे आमदार तथा मा.राज्यमंत्री सुरेशराव वरपूडकर,माजी आमदार सिताराम घनदाट मामा,पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बि.आर.देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,भाजपा प्रदेश कार्यकारीनी सदस्य संतोष मुरकुटे,शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथराव काळबांडे,गुर जिल्हा परिषद सदस्य मारोतराव बनसोडे,दैनिक सकाळचे पत्रकार जगदीश जोगदंड सर,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दिगंबर कऱ्हाळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई,भाजपा तालुकाध्यक्ष अनंता पारवे,पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे,पंचायत समिती सदस्य गोरखनाथ साखरे,पुर्णा नगर परिषद नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,शिवशासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सोलव आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून यावेळी आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात गायनाचार्य सं.वि.कैलासबुवा फरकंडेकर,श्री मोतीरामची मोहिते,श्री.दिगंबर सोन्नेकर,श्री.आसाराम महाराज व परिसरातील सर्व भजनी मंडळी सहभाग नोंदवणार असून या कार्यक्रमास मृदंगाचार्य तालमनी कृष्णा महाराज भोरकडे,श्री.ज्ञानोबा माऊली यांचे विशेष योगदान राहणार आहे या महाशिवरात्री निमित्त आयोजित श्री.कोठेश्वर महादेव यात्रा महोत्सव सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.कोठेश्वर महादेव मंदिर संस्थान व समस्थ गावकरी मंडळी कंठेश्वर यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या