💥परभणी जिल्ह्यातील मानवत येथे कवी इंद्रजीत भालेराव भाजीपाला उत्पादक ग्रुप यांची त्रैमासिक बैठक संपन्न....!


💥मानवत येथील प्रगतिशील शेतकरी रमेशराव चौधरी यांच्या शेतात घेण्यात आली त्रैमासिक बैठक💥

परभणी (दि.24 फेब्रुवारी) - जिल्ह्यातील मानवत येथे दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी शेतकऱ्यांनी शेकऱ्यांसाठी केलेली चळवळ म्हनजे भाजीपाला ग्रुप - कवी इंद्रजीत भालेराव भाजीपाला उत्पादक ग्रुप परभणी यांची त्रैमासिक बैठक प्रगतिशील शेतकरी रमेश राव चौधरी यांच्या शेतात मानवत येथे घेण्यात आली सकाळी 11-00 वाजता शिवरफेरीतून कार्यक्रमाला सुरवात झाली.


टरबूज, मिरची,काकडी पिकास प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करण्यात आली,यु.एन. आळसे सर, एकनाथराव साळवे साहेब,सोयाबीन  उत्पादक मगर साहेब,कोक्कर साहेब,पंडित थोरात,जनार्धन अवरगंड,रमेश राऊत,मुंजभाऊ शिळवणे सर  व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दुपार सत्रात नामदेवराव कोक्कर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्रास सुरवात झाली,रमेश राऊत-ओवा शेती,जनार्धन अवरगंड-शेती उद्योग,साळवे साहेब-शेतीतील धोके व जमेच्या बाजू,शीतल मुंजे-मशरूम,पंडित सत्वधर-तंरज्ञानाचा उपयोग,विष्णू निर्वाळ-संत्रा शेती अश्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडवून आणली.


       कार्यक्रमाचे विशेष म्हणजे  आज त्रैमासिक बैठकीच्या निमित्ताने नियत सेवेतून निवृत्त झाल्यामुळे व शेतकर्यांना मार्गदर्शन व सहकार्य भावना,प्रेरणादायी व्यक्तित्वामुळे आदरणीय  कवी इंद्रजित भालेराव सर गयाताई भालेराव व यु.एन आळसे सर कल्पणा आळसे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच आ.शिक्षणाधिकारी भुसारे सर व डॉ.तुषार कोक्कर यांचा देखील सन्मान करण्यात आला कवी इंद्रजित भालेराव सर यांनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर हितगुज केले,शेतकरी आत्महत्या,युवा शेतकरी,शेतकरी महिला यावर सखोल मार्गदर्शन केलं शेवटी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव काट्याकुट्याचा तुडवीत रास्ता ही  कविता म्हणून सांगता झाली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिळवणे सर यांनी केले,संघई सर,दिलीप शृंगारपुतळे संभाजी गायकवाड सुदाम माने पडीत सत्वधर मोबिन शेख,कणे शेतकरी उपस्तीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या