💥रायगड : पत्रकारांवर हल्ला करणारया च्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत....!


💥पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ नये असा पोलिसांचा पुरेपूर प्रयत्न💥

पत्रकारांवर हल्ला करणारया गावगुंडांवर कारवाई करण्यास पोलीस कायमच उदासिन असतात.. पत्रकारांवर असलेल्या रागातून अनेकदा पोलीस गुंडांना पाठिशी घालण्याचा कायम प्रयत्न करीत असतात.. रायगडमध्ये सध्या हेच दिसतंय.. एक बातमी छापली म्हणून अजय गायकवाड यांच्यावर एका हितसंबंधियाने हल्ला केला.. कर्जत तालुक्यातील नेरळची ही घटना.. १४ तारखेला हल्ला झाल्यावर कर्जत प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी पोलीस ठाण्यात गेले... पत्रकार संरक्षण कायद्याखाली आरोपीवर गुन्हा दाखल करावा ही पत्रकारांची मागणी होती.. पोलिसांना या कायद्यांचीच कल्पना नव्हती.. म्हणून त्यांनी कायद्याची प्रत मागितली... ती दिल्यानंतर फिर्यादी पत्रकार असल्या बद्दलचे त्या दैनिकाचे पत्र मागितले.. ते दिल्यानंतर संबंधीत दैनिकाचे आरएनआय प्रमाणपत्र मागितले.. (आरएनआय नंबर सर्व दैनिकावर छापलेला असतो हे मी संबंधीत अधिकाऱ्यास सांगूनही उपयोग झाला नाही.. प्रमाणपत्र द्या अशीच त्यांची मागणी होती.. वास्तवात कायद्यात आरएनआयचा कुठेही उल्लेख नाही) आम्ही ते उपलब्ध करून दिले.. त्यानंतर अशा स्वरूपाचा गुन्हा राज्यात कुठे दाखल झाला असेल तर त्या एफआयआरची प्रत द्या, मग आम्ही फलटण येथील एका गुन्ह्यातील एफआयआरची प्रत दिली.. म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ नये असा पोलिसांचा पुरेपूर प्रयत्न होता.. पण नाइलाजास्तव त्यांना गुन्हा दाखल करावा लागला.



गुन्हा १४ फेब्रुवारीला दाखल झाला खरा, पण पुढे काहीच झाले नाही.. आरोपी फरार असल्याचे सांगत पोलीस हातावर हात देऊन बसले.. एक सामांन्य आरोपी सहा दिवस झाल्यावरही पोलिसांना पकडता येत नसेल तर त्याला पकडण्याची पोलिसांची इच्छा नाही किंवा पोलीस यंत्रणाच अकार्यक्षम आहे असा आरोप करता येऊ शकतो.. आरोपीला पोलीस का पाठिशी घालत आहेत? जी माहिती मिळाली ती अधिक धक्कादायक आहे.. आरोपी हा पोलीस विभागाशी संबंधीत असल्याने पोलीस त्याला पाठिशी घालत आहेत हे स्पष्ट दिसतंय..

नेरळ, कर्जत पोलिसांच्या या निष्कीयतेच्या निषेधार्थ रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली रायगडचे पत्रकार उद्या अलिबागच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद आणि राज्यातील तमाम पत्रकार रायगडच्या पत्रकारांबरोबर आहेत.. खरं तर गुन्हा दाखल झाल्यावर अटक होणं, आरोपीला कोर्टात हजर करणं हे सारं रूटीन आहे पण त्यासाठी पत्रकारांना उपोषण करावे लागत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच शंका निर्माण होते.. हा सारा विषय आम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या कानावर घातला आहे.. त्यांनी संबंधीतांना योग्य ते आदेश द्यावेत अशी आमची विनंती आहे.. उद्याच्या उपोषणातून काही निष्पन्न झाले नाही तर मी स्वतः अलिबागला जाऊन भव्य मोर्चा काढेल आणि यामध्ये राज्यभरातून अनेक पत्रकार सहभागी होतील.. कारण काळ सोकता कामा नये हा आमचा आग्रह आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या