💥परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक इडीच्या ईडीच्या जाळ्यात...!


💥पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे जिल्ह्यात कुठेही पडसाद नाही ; जिल्ह्यात अटकेचा साधा निषेध सुध्दा नाही💥

परभणी (दि.२४ फेब्रुवारी) :- राज्याती सत्ताधारी आघाडी सरकार मधील अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून काल चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते चौकशी अंती दोषी आढळल्यामुळे त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना ०३ मार्च २०२२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली या घटनेचे नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या परभणी जिल्हा वगळता राज्यात सर्वत्र पडसाद उमटले राष्ट्रवादी पक्षाकडून जागोजाग या घटनेचा निषेध करण्यात आला.

परभणी जिल्ह्यात मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता नवाब मलिक यांच्या अटकेचा साधा निषेध सुध्दा करण्यात आला नाही त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र उलटसुलट चर्चेला उद्यान आले असून नवाब मलिक यांच्या अटकेला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छुपा पाठींबा आहे की काय ? असा प्रश्न जनसामान्यांसह राजकीय गोटातून उपस्थित होत आहे.नवाब मलिक परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांना काढावे अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती परभणी जिल्ह्याचे झेंडा मंत्री म्हणून ते प्रसिद्ध होते केवळ वर्षभरात दोन-तीनदा झेंडावंदन करण्यासाठीच ते परभणीत येत होते पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राजकीय गोटात खळबळ माजली असून नवाब मलिक यांच्या अटकेचे परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाने स्वागत केले असून नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजपाने दहन केले.

परभणी जिल्हा पालकमंत्री पदावरून नवाब मलिक यांची तात्काळ उचल बांगडी करून जिल्ह्याला नवीन पालक मंत्री तात्काळ नियुक्त करण्याची मागणी जनसामान्यांतून होत आहे......

           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या