💥श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सोहळा संपन्न...!


💥कोरोना काळात मागील दोन वर्षापासून भक्तीमय कार्यक्रम बंद होते परंतु आता भक्ती कार्यक्रम सुरू झाले आहेत💥

जिंतूर / बी. डी रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील चारठाणा येथे संत गजानन महाराज संस्थान हलविरा येथे गजानन महाराज प्रगटदिना निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कोरोना काळात मागील दोन वर्षापासून भक्तीमय कार्यक्रम बंद होते परंतु आता भक्ती कार्यक्रम सुरू झाले

        जिंतूर तालुक्यातील चारठाणा  पासून जवळच असलेल्या संत गजानन महाराज संस्थान हलविरा येथे गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दि.२१ ते २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ गजानन महाराज ग्रंथ पारायन, दि.२२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता भव्य भजन स्पर्धा आयोजित केली असून प्रथम ५१५१ रु, व्दितीय ३१३१ रु, तृतीय २१२१ रु तर उत्तेजनार्थ ११११  रु अशी बक्षीस ठेवण्यात आले आहेत दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा महापूजा  व अभिषेक सकाळी १० वा गोमाता पुजन व गोपरिक्रमा तर १० वा ह.भ.प.परमेश्वर महाराज झरिकर यांचे काल्याचे किर्तन व महाआरती व त्या नंतर महाप्रसादाचे आयोजित करण्यात आले आहे तरी ज्यास्तीत ज्यास्त भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे..,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या