💥निलंबन आदेश रद्द ठरवीत श्रीमती समीना यास्मिन करामत खान पठाण यांची जिल्हा परिषद मुख्याध्यापक पदी नेमणूक....!


💥मुख्याध्यापक समिना यास्मिन पठाण रूजू झाल्यावर शाळेतील सर्व शिक्षक वृंद कडुन त्यांचे स्वागत💥 

जिंतूर प्रतीनिधी / बी.डी.रामपूरकर

माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांची रिट याचिका क्रमांक 14282/ 2021 च्या निर्णयानुसार श्रीमती समीना यास्मिन यांना मुख्याध्यापक पदी नेमणूक देण्याचे आदेश केले. यावरून माननीय आयुक्त औरंगाबाद यांनीदेखील निलंबन आदेश रद्द ठरवीत तात्काळ नेमणूक देण्याचे आदेश केल्याने श्रीमती समीना यास्मीन करामत खान पठाण यांना जिल्हा परिषद शाळा शाखा क्रमांक 1 उर्दू येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी आदेश काढल्या वरून त्यांना आज शुक्रवार रोजी रुजू करण्यात आले. 

              मुख्याध्यापक समिना यास्मिन पठाण रूजू झाल्यावर शाळेतील सर्व शिक्षक वृंद कडुन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीकडून व पालक वर्गाकडून देखील त्यांचे स्वागत होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या