💥खपली गहू उत्पादक पुरस्कार करिता प्रस्ताव आमंत्रित.....!


💥स्व.सौ.गंगाबाई रामदास सवाई खपली गहू शेती पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित💥

फुलचंद भगत

वाशिम:-शेतकर्‍यांनी शेतीला आता एका वेगळ्या वळणावर नेण्याची आवश्यकता आहे. पारंपारिक शेतील तडा देऊन मागनीप्रमाणे बदल केल्यास शेतकर्‍यांच्या ऊत्पादनात आणि अर्थातच एकंदरीत जिवनात अमुलाग्र बदल घडु शकतो. या पार्श्वभूमिवरच सर्व धर्म मित्रमंडळ कारंजा गेल्या पाच वर्षापासून विषमुक्त सेंद्रिय शेती त्याचप्रमाणे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा याकरिता कृतिशील कार्य करत आहे. त्यामुळेच खपली गहु ऊत्पादकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता राज्यस्तरीय स्व. सौ गंगाबाई रामदास सवाई खपली गहू शेती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. परिणामी या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहे. महाराष्ट्र व ईतर भागातला खपली गव्हाचा पेरा वाढावा हा त्यामगील हेतु आहे. 

गंगा शेतकरी बचत गट लाडेगाव यांच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून खपली गव्हाचे ऊत्पादन घेतले जाते आहे. ईतर शेतकर्‍यांनीसुद्धा मोठ्याप्रमाणात खपली गव्हाचे ऊत्पादन घेण्यासाठी प्रेरीत व्हावे याकरितासुद्धा गंगा शेतकरी बचत गट कार्य करते आहे. गंगा शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्याम सवाई यांच्या कल्पनेतुनच हा पुरस्कार ऊदयास आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपले प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन श्याम सवाई यांचेकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्याने आपले नाव पत्ता शेत सर्वे नंबर खपली गव्हाच्या संदर्भातले मत खपली गव्हाचे संदर्भात आलेल्या अडचणी व त्यावर केलेल्या मात खपली गव्हाच्या उत्पादनासाठी केलेली जनजागृती खपली गव्हाच्या मार्केटिंगसाठी केलेल्या कार्याची माहिती इत्यादी बाब प्रस्तावात नमूद करून खपली गहू पेरलेल्या क्षेत्र व त्या क्षेत्रातून आलेले उत्पादनाची सरासरी ही माहिती 25 मार्च 2022 पर्यंत सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा राम गंगाई नुतन कॉलनी कारंजा लाड तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे पाठवावे. असेसुद्धा ते यावेळी म्हणाले. सन्मानपत्र देऊन पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे. 

खपली गव्हाचा पेरा वाढवा, शेतकर्‍यांची स्थिती सुधारावी व खपली गव्हाबाबत जनजागृती व्हावी याकरिता श्याम सवई सातत्याने प्रयत्न करत असतात. खपली गव्हाच्या ऊत्पादनाकरिता येणार्‍या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी त्यांचा ऊत्पादित गहु दुबईपर्यंत पाठवला आहे. ईतर शेतकरीसुद्धा खपली गव्हाचे ऊत्पादन घेऊन आपले ऊत्पादन विदेशात पाठवु शकतात. त्यामुळेच शेतकर्‍यांनी प्रेरीत होऊन आपल्या यशस्वी कथा जगासमोर आणाव्या या हेतुने हा पुरस्कार असणार असल्याचे मत सर्व धर्म मित्रमंडळाच्या शेती अभ्यासमंडळाने व्यक्त केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या