💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


💥उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिंग करणारा एकच माणूस ; सोमय्यांचा खळबळजनक आरोप💥

✍️ मोहन चौकेकर*

1. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांना वेग.. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्टसाठी  एअर इंडियाची दोन विमाने रवाना होणार,  पोलंडचीही मदतीची तयारी  

2. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील 100 हून जास्त विद्यार्थी अडकले, सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू , युक्रेनमध्ये प्रवास करताना गाडीवर भारताचा झेंडा लावा, यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी

 3. आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी.. शाळा-कॉलेज, कार्यालयातील उपस्थिती, मंदिरे-जत्रा, लग्नकार्य यावरील सर्व निर्बंध हटविण्याच्या सूचना 

4. ST विलीनाकरणाचा तज्ञ समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती.. हायकोर्टातील पुढील सुनावणी 11 मार्च रोजी 

5. मार्चपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा कोविडपूर्व काळानुसार, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीत... पालिकेकडून लवकरच परिपत्रक जारी होणार 

6. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिंग करणारा एकच माणूस; सोमय्यांचा खळबळजनक आरोप , यशवंत जाधवांनी मनी लाँड्रिंग केलं, तर महापौरांनी SRA सदनिका हडपल्या; किरीट सोमय्यांचा घणाघात 

7.  केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना! BMC नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर खात्याचे छापे ,  'डर्टी डझन' लिस्टमध्ये आणखी दोन नावे, किरीट सोमय्यांनी ट्वीट करत दिली माहिती 

8. एका मंत्र्याला समर्थन देण्यासाठी सगळं मंत्रीमंडळ रस्त्यावर, पण शेतकऱ्यांची चौकशी करायला वेळ नाही.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा सवाल  

9.  देशात गेल्या 24 तासांत 13,166 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 302 जणांचा मृत्यू , राज्यात गुरूवारी 1182 नव्या रुग्णांची नोंद, 21 महानगरपालिकांमध्ये शून्य मृत्यू 

10. IPL 2022 Update : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात

11.Russia Ukraine War Highlights : घनघोर युद्ध; रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीजवळ दाखल

12.Weather : महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला, तर उत्तर भारतात पावसाचा अंदाज 

13.National War Memorial Anniversary : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन

14.ऑलिम्पिकवीर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ठरली पात्र....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या