💥वाशिम तालुक्यातील साखरा येथील मॉडेल स्कूलच्या बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी....!


💥उपशिक्षणाधिकारी श्री.डाबेराव,जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.पाटील यावेळी उपस्थित होते💥

फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम तालुक्यातील साखरा येथे बांधण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूलच्या बांधकामाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपशिक्षणाधिकारी श्री.डाबेराव,जि. प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. पाटील यावेळी उपस्थित होते.

      साखरा येथून जवळच असलेल्या २४ एकर जागेत मॉडेल स्कूलची इमारत बांधण्यात येत आहे. २ कोटी ५० लक्ष रुपये निधी इमारतीच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे.या निधीतून १८ वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू आहे.जून  २०२२ पर्यंत मॉडेल स्कूलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले.येणाऱ्या शैक्षणिक वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात यावे.बांधकामाचा दर्जा उत्तम असावा.बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये.मॉडेल स्कूलच्या अंतर्गत बांधण्यात येणारी रस्ते,वृक्षारोपणाची व पाणीपुरवठ्याची काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी श्री.षण्मुगराजन यांनी दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या