💥आयुर्वेद तज्ञ डॉ.सुजित सोमाणी व डॉ. सुविधा सोमाणी यांच्या मदर नेचर क्लिनीकच्या वतीने नगरसेवक संजु वाडे यांचा सत्कार...!


💥स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो रूग्णांना बरे करणाऱ्या डॉ.सोमानी दाम्पत्याची कार्याची वाडे यांनी प्रशंसा केली💥

फुलचंद भगत

वाशीम (दि.१९ फेब्रुवारी) : येथील मनिप्रभा रोड वरील आयुर्वेद तज्ञ डॉ. सुजित सोमाणी व डॉ. सुविधा सोमाणी यांच्या मदर नेचर क्लिनीकला शिवसेना संपर्क प्रमुख तथा मनपा नगरसेवक संजु आधार वाडे यांनी भेट देवून आयुर्वेदा बद्दल माहिती जावून घेतली. सोमाणी दाम्पत्यांनी कोरोना कार्यकाळात हजारो आयुर्वेद किटचे मोफत वितरण करून सामाजिक बांधीलकी जोपासली. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हजारो रूग्णांना बरे केले.  त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.  यावेळी डॉ. सोमाणी दाम्पत्यांनी संजु वाडे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. सोबतच त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात केलेल्या वेगवेगळया प्रयोगाची माहिती देत कोरोना कार्यकाळात तयार केलेली किटही यावेळी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या