💥पुर्णा नगर परिषदेकडून नागरी सुविधांचा अभाव असलेल्या भागातील नागरिकांकडून सक्तीने नळपट्टी/घरपट्टी वसुली....!


💥शहरातील आनंद नगर,अमृत नगर,आदर्श कॉलनी आदी भागातील नळपट्टी/घरपट्टी वसुली बंद करण्याची मनसेची मागणी💥 


पूर्णा (दि.२५ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषद प्रशासन मागील अनेक वर्षापासून शहरातील आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमुत नगर, अलंकार नगर आदी भागातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्यासह अन्य नागरी सुविधा पुरवण्यास अकार्यक्षम ठरत असतांनाही या भागातील नागरिकांकडून सक्तीने पाणी पट्टी घरपट्टी वसुली करीत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहतींमध्ये समावेश असलेल्या आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमुत नगर,अलंकार नगर आदी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहीण्यांतून अर्थात नळाच्या माध्यमातुन शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही अनेक ठिकाणी पाईपलाईन ना दुरुस्त्य आहे त्यामुळे नागरीकांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी सुध्दा निश्क्रिय नगर परिषद प्रशासनाकडून या गंभीर बाबाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आनंद नगर,आदर्श कॉलनी या भागातील नागरीकांना मागील अनेक वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रचंड सामना करावा लागतो त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे पाणी विकत घेऊन संपूर्ण उन्हाळा काढावा लागतो त्यामुळे नागरीकांसह महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की नगर परिषदेकडून पाणी नाही मग आम्ही पाणी पट्टी काय म्हणून भरायची ? अशा प्रश्न उपस्थित केला आहे. 

आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमुत नगर,अलकार नगर,मॉ साहेब जिजाऊ नगर आदी भागातील नळ पट्टी व घर पट्टी वसुली नगर परिषद प्रशासनाने तात्काळ थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल अशा ईशारा मनसेचे शहर अध्यक्ष गोविंद (राज) ठाकर तालुका अध्यक्ष अनिल बुचाले योगेश भोसले बालाजी वाघ ,पंकज राठोड राजेश यादव शेख गौस आदी कार्यकर्तानी दिला आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या