💥जिंतूर तालुक्यातील कावी येथून राशनचे ५० पोते धान्य काळ्या बाजारात घेऊन जाणारे संशयास्पद वाहन गावकन्यांनी पकडले..!


💥तहसीलचे अधिकाऱ्यांचा अहवाल आल्या नंतरच या वाहनावर कार्यवाही होणार💥

जिंतुर / बी.डी.रामपूरकर, 

जिंतूर (दि.१८ फेब्रुवारी) - तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी येथील काळ्याबाजारात रेशनचे धान्य दि. १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गावकऱ्यांनी पकडले. मिळालेल्या अधिक माहितीवरून कावी या गावातून गहू व तांदूळ असे पन्नास कट्टे राशन चे धान्य मध्यरात्री काळ्याबाजारात जाताना कावी येथील सरपंच (पती) रामनारायण काठमोरे, उपसरपंच गणेश थोरवे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लिपणे, बाबुराव प्रधान, बाळू माणिक शिंदे आदींनी पिकअप एम एच २६/ १७३२ हा संशयित रित्या जात असताना विचारणा केली असता सदर कावी येथील राशन चा माल असल्याचे ग्रामस्थांना लक्षात आले असता येथील राशन दुकानदार हे वाहन जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र जमलेल्या गावकऱ्यांनी स, पो, नि वसंत मुळे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कंट्रोल रूमला कॉल करून सदर घटना सांगितली तद्नंतर बामणी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज स, पो, नि वसंत मुळे यांनी घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक हनुमंत नागरगोजे यांना पाठवून घटना स्थळाचा पंचनामा करून बामणी पोलिसांनी सदर वाहन हे बामणी पोलीस स्टेशन येथे आणून लावले. पुढील खात्री करून कार्यवाहीस्तव तहसीलदार जिंतूर यांना कळविण्यात आले आहे. तहसीलचे अधिकारी यांचा अहवाल आल्या नंतरच या वाहनावर कार्यवाही होणार आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या