💥महिलांनी स्वयंरोजगाराची कास धरावी - सतीशभाऊ गुप्त

💥डोणगाव येथे चिखली अर्बन बँकेतर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्याच्या कर्ज वाटप प्रसंगी ते बोलत होते💥

✍️ मोहन चौकेकर

डोणगाव : आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता महिलांनी लघु व मध्यम उद्योगांची निवड करुन स्वयंरोजगार निर्मिती करून स्वयंरोजगारची कास धरावी असे आवाहन चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड चिखलीचे अध्यक्ष  तथा महिला बचत गट कर्ज योजनेचे संस्थापक मा.सतीशभाऊ गुप्त यांनी डोणगाव येथे चिखली अर्बन बँकेतर्फे आयोजित महिला बचत गटमेळाव्याच्या कर्ज वाटप प्रसंगी बोलताना केले. 


यावेळी बोलताना सतीश गुप्त पुढे म्हणाले की  महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तसेच महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात दृष्टिकोनातून महिला बचत गट कर्ज योजना चिखली  अर्बन बँकेच्या माध्यमातून राबविल्या जात असून यामुळे  हजारो महिलांना दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून छोट्यामोठ्या व्यवसायांना कर्ज पुरवठा उपलब्ध होत असल्याने हजारो महिलांना स्वयंरोजगार निर्मिती करता चालना मिळाली असून  दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड चिखली शाखा डोणगावच्या  वतीने महिला बचत गटांनसाठी कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.या वेळी तीन बचत गटातील ५० महिलांना  ४० लक्ष रुपयाचे कर्जाचे वितरण दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष माननीय सतीश भाऊ गुप्त यांच्या सह  बँकेचे जेष्ठ   संचालक मनोहरजी  खडके सर , डोणगाव शाखेचे  पालक संचालक मा शैलेशजी बाहेती ,  डोणगाव शाखेचे सल्लागार जयंत बिडवई ,अनिल आवटी , राजकुमार सारडा आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बॅकेचे पालक संचालक मा. शैलेशभाऊ बाहेती  यांनी बॅकेच्या डोणगाव शाखेची स्थापना १९८७ रोजी झाली असुन  सध्या आजरोजी  बॅकेच्या ठेवी ६४ कोटी रुपयांच्या असल्याचे सांगितले.  २फेंब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात आलेल्या डायमंड ज्यूबली ठेव योजनेमध्ये अवघ्या वीस बावीस दिवसांत १ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्याची माहिती या वेळी  शाखाधिकारी सुरज खंडेलवाल यांनी दिली . यावेळी संजय म्हळसणे. बचत गट प्रतिनिधी चंद्रकांत माहुरे यांच्या सह सर्व कर्मचारी  उपस्थित होते. महिलांच्या बचतगटांच्या कर्ज वाटप मेळाव्यानंतर पसायदाने कार्यक्रमाची सांगता झाली....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या