💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्याला यश.....!


💥सावंगी खुर्द येथील कालव्यावरील पुलाचे काम पूर्ण,पुल वाहतुकीसाठी खुला💥

परभणी -  निम्न दुधना प्रकल्प उजव्या कालाव्यावरील सावंगी खुर्द येथील पुलाचा लोकार्पण सोहळा भागवतकार श्री. रामप्रसाद शिंदे महाराज मांगणगावकर व सावंगी खुर्द येथील दिव्यांग श्री. दत्तराव रवंदळे यांच्या हस्ते आज रोजी संपन्न झाला मागील १०-१२ वर्षापासून या कालव्यावर पुल व्हावा यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला परंतु पुलाचे काम होत नव्हते. दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सावंगी खुर्द येथील शेतकऱ्यांनी या कालव्यावर पुल व्हावा म्हणुन परीसरातील शेतकऱ्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी मागणी केली होती. 

या मागणीनुसार दि ३१ डिसेंबर २०२१ राजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजलगाव कालवा क्र. १० चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब यांची भेट घेऊन त्यांना संबंधीत पुलाचे काम तात्काळ मार्गी लावणे बाबत मागणी केली होती व मागणीनुसार संबंधीत पुलाचे काम जलसंपदा विभागामार्फत तात्काळ हाती घेण्यात आले होते. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा करून पुलाचे काम सुरु झाल्यानंतर राजकीय श्रेयवादाच्या लढाईमुळे व राजकीय दबावामुळे या पुलाचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने थांबविण्यात आले होते. पुलाचे काम थांबल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले व हा पुल तात्काळ सुरु करा अन्यथा कार्यालयाला कायमचे कुलुप ठोकू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा क्र. १० यांना दिल्यानंतर दोनच दिवसात जल संपदा विभागाने पुलाचे काम सुरु केले होते.

दोन दिवसापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले असुन आज दि २३ फेब्रुवारी २०२२ रोजी या पुलाचा लोकार्पण सोहळा प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला व हा पुल रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावर ८ ते १० गावाच्या गावकऱ्यांची वाहतुक असल्याने व पुल नसल्यामुळे ५ कि.मी. चा अतिरिक्त वेढा मारुन पर्याची रस्ता वापरण्याशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नव्हता परंतू हा पुल झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेती माल नेण्यासाठी व परिसरातील ८ ते २० गावांना जोडण्यासाठी कमी अंतर पार करावे लागणार आहे.

 सावंगी खुर्द व परिसरातील शेतकऱ्यांनी मा. ना. बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पाठपुरावा करुन दिलेला शब्द पाळत पुल बांधून दिल्याबद्दल शिवलिंग बोधने जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष परभणी व प्रसाद लांब कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा क्र. १० यांचे आभार मानले आहेत.

आजच्या पुल लोकार्पण कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने युवा आघाड़ी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे , सावंगी खुर्दचे माजी सरपंच गुलाबराव पंढरकर , दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, मिडिया प्रभारी नकुल होगे, वैभव संघई, कैलास पुंजारे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या