💥मंगरुळपीर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध...!


💥मंत्री मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ ऊपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन💥 

(फुलचंद भगत)

वाशिम:-मंगरुळपीर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्यांक मंत्री ना नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

                  निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना नवाब मलिक यांचेवर केंद्र सरकारने राजकीय आकसापोटी ई डि च्या माध्यमातून सूडबुद्धीने कारवाई केली आहे. ही अटक अतिशय निंदनीय असून याचा आम्ही निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.तत्पूर्वी स्थानिक भगतसिंह चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर,चंदुभाऊ परळीकर,नगरसेवक लईक अहमद,अब्रार कुरेशी, जमील कुरेशी,विनोद पाटील,ओमप्रकाश शर्मा,चंद्रकांत देवळे, रामेशसिंग रघुवंशी,विठ्ठलराव काळे,राजू बोरकर,संतोष संगत,रहेमतअली पहेलवान,संदिप हरिहर आदिंची उपस्थिती होती.


प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या