💥पुर्णा तालुक्यातील चुडावा सर्कल मधील ८० दिव्यांग बांधव शासकीय स्वस्त धान्यापासून वंचित ; राशन कार्ड देण्यासही टाळाटाळ...!


💥दिव्यांग बांधवांनी दिली प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांच्याकडे तक्रार💥


पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - तालुक्यातील पुरवठा विभागाचा कारभार आंधळ दळत अन् कुत्र पिठ खाते अश्या पध्दतीचा झाल्याचे निदर्शनास येत असून शासकीय स्वस्त धान्याचा पुरवठा सिधा पत्रिका धारकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात तर मिळतच नाही अन् मिळाला तरी अश्या पध्दतीचा मिळतो की तो धान्य पुरवठा मानस तर सोडाच जनावर सुध्दा खाणार नाहीत याही पेक्षा गभीर व संतापजनक बाब म्हणजे प्राधान्याने ज्या दिव्यांगांना शासकीय स्वस्त धान्याची आवश्यकता आहे त्या दिव्यांगांना सुध्दा स्वस्त धान्यापासूनच नव्हे तर सिधा पत्तिकेपासून सुध्दा वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यात एकट्या चुडावा सर्कल मधील तब्बल ८० दिव्यांगांचा समावेश आहे.


तहसिल मधील पुरवठा विभागाच्या निश्क्रिय कारभाराला त्रस्त झालेल्या चुडावा सर्कल मधील हिवरा बु. येथील गावकरी मंडळी व दिव्यांग बांधवाची आज सोमवार दि.२१ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी प्रत्यक्ष भेट घेतली या भेटी मध्ये ८० दिव्यांगांनी आम्हाला राशन कार्ड अर्थात सिधापत्रिका आज प्रर्यंत मिळाले नाही त्यामुळे सिधापत्रिका नाही तर राशन कसे द्यायचे असा प्रश्न स्वस्त धान्य वितरकाकडून केला जातो अश्या वेळी आम्ही करायचे तरी काय ? असा प्रश्न तालुकाध्यक्ष सोनटक्के यांच्या समोर दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला दिव्यांग बांधवांची ही दयनीय अवस्था पासून प्रशासनातील दगडाच्या काळजाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट अधिकाऱ्यांना यत्किंचितही पाझर फुटत नसेल काय ? असा प्रश्न तालुक्यात सर्वत्र उपस्थित होत आहे.यावेळी गावचे सरपंच उतमराव नादरे साहेब सुरेश वाघमारे, सुभाष गोविंद चादनेबेटकर,लिबाजी नादरे गजानन पाचाळ,प्रयागबाई नादरे,सोनाली वाघमारे,सुलोचना माहुरे ,शिवकाता जारे,आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या