💥जिंतूरच्या कर्तव्य फौंडेशन, जवाहर विद्यालय 1995 बैच चा उपक्रम...!


💥एस टी संपात असलेल्या कर्मच्याराना जीवन आवश्यक वस्तूच्या किटचे वाटप💥

जिंतूर प्रतीनिधी / बी.डी. रामपूरकर

ग्रामीण भागातील प्रमुख दळणवळणाच साधन म्हणजे एसटी, ग्रामीण भागातील शिक्षणाची गंगा वाहून नेण्याची नाव म्हणजे एसटी, सर्वसामान्यचे हक्काचे व सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणजे एसटी.याच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी मागील.. दिवसापासून संप पुकारला आहे. कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. कर्मचारी बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांची ही अडचण समजून कर्तव्य फौंडेशन बॅच 95 जवाहर विद्यालय जिंतूर यांच्या वतीने गरजु चालक, वाहक व यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना 50 अन्नाधान कीट चे वाटप करण्यात आले.

खरोखर वसा सामाजिक बांधिलकीचा हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवत समाजात एक आदर्श पायंडा बॅच 95 चे विद्यार्थी पाडत आहेत. अडचणीच्या काळात कर्तव्य फौंडेशन नेहमीच मदतीला धावून येत असते. कोरोना काळात ही कर्तव्य फौंडेशन ने 72 गरजु कुटुंबाना अन्नधान्य कीट चे वाटप केले होते. जिंतूर परभणी रोड च्या आंदोलनात ही कर्तव्य फौंडेशन ने सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गुरुकुल, मदरसा येथील गरीब विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप तसेच वडिलांच छत्र हरवलेल्या विदयार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप आदी उपक्रम या फौंडेशन च्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या