💥पुर्णा तालुक्यातील गौर येथे ११ व्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात...!


💥श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचेही आयोजन💥

पुर्णा (दि.०३ जानेवारी) तालुक्यातील गौर गावातील जागृत देवस्थान सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थानात काल रविवार दि.०२ जानेवारी २०२१ रोजी ११ व्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात झाली असून या सप्ताहा निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असून राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्देशांचे पालन करीत या प्रतिवर्षी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात करण्यात आली आहे.

या सोमेश्वर महादेव देवस्थान व गावकरी मंडळींच्या वतीने आयोजित ११ व्या अखंड हरिनाम सप्ताहास संगीत भागवताचार्य श्री.हभप.दिपक गुरू जोशी पांगरेकर हे श्रीमद् भागवत कथेचे वाचन करणार असून ज्ञानेश्वरी पारायनाचे नेतृत्व श्री.हभप.भिकाजी महाराज भोगले गौरकर व श्री.हभप.बालाजी महाराज भाटेगावर हे करणार आहेत.... 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या